Wednesday, July 3, 2024

फटाक्यांची लडी असणारा ड्रेस घालत अक्षयने घेतली केबीसीमध्ये एन्ट्री, तर अमिताभ यांनी केला कॅटरिनासोबत रोमॅंटिक डान्स

येत्या काही दिवसात अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्या या संपूर्ण चित्रपटाची टीम सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या टीमने अनेक मराठी शोमध्ये जाऊन देखील चित्रपटाचे प्रमोशन केले. आता ही टीम अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट अशा ‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या सेटवर पोहचली आहे. येत्या शुक्रवारी ‘शानदार शुक्रवार’च्या निमित्ताने आपल्याला केबीसीमध्ये अक्षय कुमार, दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना दिसणार आहेत. यावेळी अक्षय कुमारने चक्क फटाक्यांच्या लडी असणारा ड्रेस घालत अमिताभ यांच्या ‘सारा जमाना’ या गाण्यावर डान्स करत एन्ट्री मारली.

 

केबीसीमध्ये १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर हा दिवाळी स्पेशल आठवडा साजरा करण्यात येणार आहे. यासाठी केबीसीच्या सेटला अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवण्यात देखील आले आहे. या आठवड्याच्या शानदार शुक्रवारमध्ये ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची टीम येणार असून, हा भाग नुकताच शूट करण्यात आला आहे. या भागाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, ते पाहून प्रेक्षक हा भाग बघण्यस्तही अधिकच उत्साहित झाले आहे.

या खेळादरम्यान अक्षय, कॅटरिना आणि रोहित यांनी अनेक मजेदार क्षण देखील घालवले. याशिवाय या सर्वानी अनेक किस्से, अनेक आठवणी देखील एकमेकांसोबत आणि प्रेक्षकांसोबत शेअर केल्या. रोहित शेट्टीने त्याच्या वडिलांच्या फाईट मास्टर असणाऱ्या शेट्टी यांच्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत असणाऱ्या खास आठवणी देखील सांगताना दिसणार असून, त्याने त्याच्या आईसाठी लिहिलेल्या खास ब्लॉगवर अमिताभ बच्चन यांची स्वाक्षरी देखील घेतली.

या फोटोंमध्ये कॅटरिना पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, तर अक्षयने आकाशी रंगाचा, रोहितने नेव्ही ब्लू रंगाचा सूट घातला आहे. यादरम्यान अक्षयने त्याच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितले, कॅटरिना आणि अमिताभ यांनी एक डान्स देखील केला. याशिवाय शोमध्ये कॅटरिनाचा या सिनेमाचा सेट झाडत असल्याचा व्हिडिओ देखील दाखवण्यात आला.

तत्पूर्वी ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा मागच्यावर्षी मार्चमध्येच प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनाच्या महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला असून आता हा सिनेमा जवळपास दीड वर्षाने प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ दिवशी रेशीमगाठीत अडकणार राजकुमार राव अन् पत्रलेखा, जाणून घ्या लग्नाची संपूर्ण माहिती

-आलिया- रणबीर अन् कॅटरिना- विकीच्या आधी राजकुमार अन् पत्रलेखा थाटणार आपला संसार; मित्रांना पाठवले निमंत्रण?

-राजकुमारच्या आईची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण; निधनानंतर अमिताभ यांनी अभिनेत्याला पाठवला होता व्हिडिओ

हे देखील वाचा