मागील अनेक महिन्यांपासून सतत चर्चेत असणारा सिनेमा म्हणजे ‘ओह माय गॉड 2’. सिनेमाच्या घोषणेनंतर हा सिनेमा सतत चर्चेत येत होता. २०१२ मध्ये आलेल्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘ओ माय गॉड २’मध्ये अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला. दीड मिनिटाच्या या टीझरने सिनेमाबद्दलची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. या सिनेमात अक्षय कुमार शंकराच्या भूमिकेत दिसणार असून पंकज एका आस्तिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान अक्षय कुमारने नुकताच एक खुलासा केला आहे. जेव्हा अक्षय ओह माय गॉड सिनेमा करत होता तेव्हा त्याच्या आईने त्याला एक सल्ला दिला होता. हा सल्ला कोणता याबद्दल त्याने मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे. अक्षय कुमारने सांगितले की, त्याच्या करियरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका २०१२ साली आलेल्या ओह माय गॉड सिनेमातील कृष्णाची होती. हा सिनेमा जेव्हा तो करत होता तेव्हा त्याच्या आईने त्याला एक गोष्ट सांगितली होती.
अक्षय कुमारने सांगितले की, ‘OMG’ चित्रपटात जेव्हा तो कृष्णाची भूमिका करणार होता तेव्हा त्याच्या आईने त्याला मांसाहार सोडण्यास सांगितले होते. अक्षय कुमारची आई या कृष्णाच्या भक्त होत्या. त्यांची इच्छा होती की, या चित्रपटात कृष्णाची भूमिका साकारताना त्यांच्या मुलाने शुद्ध सात्विक आहार घेत काही नियमांचे पालन करावे. मुख्य म्हणजे अक्षयने देखील त्याच्या आईचा सल्ला ऐकला आणि त्याने मांसाहार सोडला होता.
तत्पूर्वी, ‘ओ माय गॉड २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठी, आणि यामी गौतम हे देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. आकर्षणाची बाब म्हणजे या चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका अभिनेते अरुण गोविल साकारणार आहेत.
अधिक वाचा-
दोन वर्ष अंथरुणाला खिळून देखील ‘या’ अभिनेत्याने केले जोरदार कमबॅक, एका चित्रपटाचे घेतो ५० कोटी
करिअरमध्ये1699 मॅच जिंकणाऱ्या अंडरटेकरला अक्षय कुमारने चारलेली धूळ? एका क्लिकवर कळेल खरं की खोटं