Thursday, July 18, 2024

स्वतःचे सीन स्वतःच करणाऱ्या अक्षय कुमारने थेट ४६ व्या मजल्यावरून मारली होती उडी, तेव्हा…

अक्षय कुमार अर्थात बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार आणि स्टंट हे जणू समीकरणच बनले आहे. अक्षय नेहमीच त्याच्या चित्रपटांइतकाच त्याच्या दमदार आणि भयानक स्टंट्ससाठी देखील ओळखला जातो. अक्षय नेहमीच त्याचे स्टंट स्वतःच करतो. लवकरच अक्षय ‘पृथ्वीराज’ सिनेमातून एकापेक्षा एक स्टंट करताना दिसणार आहे. अक्षयचा मागचा ‘बच्चन पांडे’ सिनेमा तर फ्लॉप ठरला आता अक्षयला ‘पृथ्वीराज’कडून मोठ्या अपेक्षा आहेत. अक्षय नेहमीच त्याचे स्टंट करतो मात्र यशराजच्या या ‘पृथ्वीराज’मध्ये त्याला त्यांच्या पॉलिसीनुसार काही खतरनाक स्टंट स्वतः करता आले नाही. अक्षयच्या स्टंटचे आणि त्याच्या ऍक्शन सीनचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अक्षय कुमारचा १९९८ साली ‘अंगारे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात अनेक खतरनाक स्टंट होते जे स्वतः अक्षयने केले होते. या सिनेमात अक्षयसोबतच दाक्षिणात्य स्टार नागार्जुन, सोनाली बेंद्रे, पूजा भट्ट, परेश रावल आदी कलाकार मुख्य भूमिकेत होते. याच सिनेमातील एक सर्वात कठीण आणि खतरनाक स्टंट मुंबईमधील वर्सोवा या भागात शूट होत होता. हा स्टंट अक्षयच करणार होता, मात्र त्याने हा स्टंट करू नये अशी निर्मात्यांची इच्छा होती, कारण जर देव न करो अक्षयला काही झाले तर शूटिंग थांबेल आणि निर्मात्यांचे मोठे नुकसान होईल.

‘अंगारे’ सिनेमातील सीन असा होता ज्यात अक्षयला एका इमारतीच्या ४६ व्या मजल्यावरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारायची होती. ऍक्शन दिग्दर्शक असलेल्या अकबर बक्षी यांनी सीनची सर्व तयारी केली. आणि ठरवले की हा सीन अक्षयचा बॉडीडबल करणार मात्र अक्षयने स्वतःच सीन करायचे ठरवेल. शूटिंग बाहेर होत असल्याने मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. जेव्हा सीन सुरु झाला तेव्हा सर्वच लोकं तोंडात जीव आणून तो सीन पाहत होते, कारण थोडी चूक देखील मोठी महागात पडली असती. सीन पूर्ण झाल्यानंतर सर्वानी टाळ्या आणि शिट्या वाजवून अक्षयचे कौतुक केले.

जेव्हा अक्षयने हा स्टंट करायला सुरुवात केली तेव्हा तिथे क्रूसोबतच शूटिंग बघण्यासाठी आलेल्या सर्व लोकांना खूपच भीती वाटत होती. मात्र तो स्टंट सीन पूर्ण झाला. त्यानंतर अक्षय दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याजवळ आला, त्याला वाटले ते त्याचे कौतुक करतील, महेश यांनी त्याचे कौतुक केले सोबतच त्याला म्हणाले अभिनय कधी करणार?

अक्षयने अनेकदा हा खुलासा केला आहे की, ती बॉलिवूडमध्ये त्याच्यापेक्षा अधिक आणि देखणे अनेक अभिनेते आहेत, मात्र तो हिट होत आहे यामागे फक्त आणि फक्त १०० टक्के त्याचे नशीब आहे. त्याला वाटते की, तो खूपच साधारणपणे त्याचे संवाद म्हणतो, मात्र त्याचे फॅन्स त्याच्या संवादांना, सिनेमांना, ऍक्शनला एका उंचीवर नेऊन ठेवतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा