Wednesday, July 17, 2024

करियरच्या पहिल्या 10 वर्षांमध्ये अक्षय कुमारले कमावले होते केवळ ‘इतके’ रुपये, स्वतःच केला खुलासा

बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता म्हणून अक्षय कुमारचे नाव घेतले जाते. अतिशय शिस्तप्रिय आणि प्रतिभावान असलेला अक्षय त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत येत असतो. सध्या तो त्याच्या ‘सेल्फी’ या सिनेमामुळे खूपच लाइमलाईट्मधे आला आहे. सगळीकडे फक्त त्याच्या याच सिनेमाच्या चर्चा होतांना दिसत आहे. अक्षय हा भारतातील सर्वात जास्त टॅक्स भरणारा अभिनेता म्हणून देखील ओळखला जातो. एका वर्षात जास्त सिनेमे देखील तो करतो. अक्षयसोबत काम करणे प्रत्येक निर्माता, दिग्दर्शकाला शक्य नाही. कारण तो एका सिनेमासाठी भलीमोठी रक्कम मानधन म्हणून घेतो. आज अतिशय मोठा अभिनेता असणारा आणि करोडोंमध्ये खेळणारा अक्षय आधी असा नव्हता. काही शे रुपयांसाठी त्याने खूप जास्त मेहनत केली आहे.

अक्षय कुमारने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या जुन्या दिवसांना उजाळा दिला आहे. काही शे रुपये वाचवण्यासाठीचा त्याचाच संघर्ष देखील त्याने यावेळी सांगितला. तो त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये महिन्याला किती रुपये कमवायचा हे ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. अक्षय कुमारने ‘दिदार’ या सिनेमात काम केले होते. या सिनेमासाठी त्याला 50 हजार रुपये देण्यात आले होते. त्याचा सौगंध आधी प्रदर्शित झाला. मात्र त्याला पहिला ब्रेक दिदार मधून मिळाला होता. अक्षयला सौगंधसाठी 75 हजार रुपये देण्यात आले होते.

akshay kumar

या मुलाखतीमध्ये अक्षयने सांगितले की त्याला नेहमीच 10 कोटी रुपये कमवायची खूप इच्छा होती. मात्र करियरच्या सुरुवातीच्या 10 वर्षांमध्ये त्याने केवळ 18 ते 20 लाख रुपये कमावले होते. अक्षय यावेळी म्हणाला, “10 कोटी कमावण्यासाठी मला 12 वर्ष लागले. 10 कोटी कमवल्यानंतर मी विचार केला की मला अजून पैसे कमवायचे आहे. पुढे मी खूप मेहनत केली आणि मी 100 कोटी देखील कमावले. मला वाटे की सतत काम करत राहायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे.”

अक्षय कुमारच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, “त्याचा नुकताच सेल्फी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. मात्र या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याआधी त्याचे बच्चन पांडे’, ‘रक्षा बंधन’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘राम सेतु’ आदी सिनेमे देखील बॉक्स ऑफिसवर कमल दाखवू शकले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅक टू बॅक फ्लाॅप चित्रपटांवर अखेर अक्षय कुमारने साेडले माैन; म्हणाला, ‘ही माझी चूक…’

‘तारक मेहता’ वयाच्या 42 व्या वर्षी पुन्हा अडकला लग्नबंधनात, इंटिरियर डिझायनर चांदनीसोबत थाटला संसार

 

 

हे देखील वाचा