Saturday, June 29, 2024

नसीरुद्दीन शाह यांनी त्याच्या ‘या’ सिनेमात अक्षय कुमारकडून करून घेतली होती नाकघासणी

बॉलिवूडमधील अतिशय प्रभावी आणि प्रतिभासंपन्न अभिनेते म्हणून नसीरुद्दीन शाह ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या संपूर्ण करियरमध्ये अतिशय उत्तोमत्तम भूमिका दमदार पद्धतीने साकारत अजरामर केल्या. नसीरुद्दीन शाह यांची भूमिका असलेला सिनेमा म्हणजे नक्कीच उत्तम सिनेमा असणार हे सर्वश्रुत असते. सिनेमात मुख्य भूमिका असो, पाहुण्या कलाकाराची भूमिका असो, खलनायकी भूमिका असो त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केले. त्यांच्या खलनायकी भूमिका असलेला सिनेमांमध्ये ते मुख्य अभिनेत्यावर देखील भारी पडले.

नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या करियरमध्ये एकापेक्षा एक उत्तम भूमिका केल्या. त्यांच्या अभिनयातली एक सुंदर आणि महत्वाची बाब म्हणजे तर चित्रपटात किंवा रंगमंचावर काम करताना कधीही समोरच्या कलाकाराला आपल्यावर हवी होऊ देत नाही. त्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचा असाच एक सिनेमा होता ज्यात त्यांनी खलनायक रंगवला आणि अक्षय कुमारने मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

राजीव राय यांचा १९९४ साली आलेल्या ‘मोहरा’ या सिनेमात नसीरुद्दीन यांनी क्रूर असलेला ‘जिंदाल’ या खलनायकाची भूमिका साकारली होती. हा सिनेमा तुफान गाजला. सुनील शेट्टी, रवीना टंडन, परेश रावल, रजा मुराद, सदाशिव अमरापूरकर आदी दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाला अमाप लोकप्रियता मिळाली.

या सिनेमात अक्षय आणि नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली. जरी सिनेमात नसीरुद्दीन शाह खलनायक होते आणि अक्षय नायक होता, तरी देखील शेवटी नसीर साहेबांनी अक्षयकडून नाकघासणी घेतले होते. आजही हा सिनेमा बघताना नसीर साहेबांच्या अभिनयाची भुरळ सर्वांना पडल्याशिवाय राहत नाही. नसीरुद्दीन शाह यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आणि मुख्य म्हणजे त्यांच्या सर्वच भूमिका चांगल्याच गाजल्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काली काली जुल्फों के …! रिधीमा पंडीतची घायाळ करणारी अदा, पाहाच फोटो गॅलरी
अनुपम खेर यांनी ट्विट करत ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची केली मागणी, अक्षय कुमारने देखील दिला दुजोरा

हे देखील वाचा