Thursday, March 28, 2024

चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर अक्षय कुमारने घेतला राजकारणात येण्याचा निर्णय, म्हणाला ‘सामाजिक मुद्द्यांवर लक्ष देणार’

अक्षय कुमार (Akshay Kumar) हा हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि डॅशिंह भूमिकांनी अनेक दशके अक्षय कुमारने बॉलिवूडवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. परंतु अलिकडच्या काळात अक्षय कुमारचे चित्रपट जोरदार आपटल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. कदाचित यामुळेच अक्षय कुमारने सिने जगत सोडून आता राजकारणात प्रवेश करणार असल्याचे दिसत आहे. याबाबत अलिकडेच अक्षय कुमारने खुलासा केला आहे. 

अक्षय कुमार अनेकदा आपल्या चित्रपटांमधून अनेक सामाजिक विषयांवर बोलताना दिसत असतो. पण अलीकडेच जेव्हा अक्षयला राजकारणात येण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्याने पुन्हा एकदा आपला हेतू स्पष्ट केला. अक्षय कुमार सध्या पत्नीसोबत लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये एका बुक लाँच कार्यक्रमात अक्षय प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचला होता. निमित्त होते प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट समीक्षक अजित राय यांच्या ‘हिंदुज आणि बॉलिवूड’ या पुस्तकाचे प्रकाशन. या कार्यक्रमात चित्रपट बनवून सामाजिक प्रश्न मांडण्यात खूप समाधान मिळते. असे स्पष्टिकरण दिले होते.

राजकारणात येण्याच्या प्रश्नावर बोलताना अक्षय कुमार म्हणाला, ‘चित्रपट बनवताना मला खूप आनंद होतो. एक अभिनेता म्हणून मी सामाजिक प्रश्न मांडण्याचा माझ्या परीने प्रयत्न करेन. मी 150 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि ‘रक्षा बंधन’ माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा चित्रपट आहे. मी व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करतो जे कोणत्या ना कोणत्या सामाजिक विषयावर भाष्य करतात. मी दरवर्षी 3 ते 4 चित्रपट बनवत आहे.

अक्षयचा नवा चित्रपट ‘रक्षा बंधन’ हुंड्याच्या मुद्द्यावर भाष्य करणारा आहे. त्याच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या प्रसंगी अक्षय म्हणाला, ‘मी जेव्हा चित्रपट बनवतो तेव्हा मी फक्त समस्येवर बोलत नाही, तर त्यावर उपायही सांगतो. ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ असो किंवा ‘पॅड मॅन’, माझ्या प्रत्येक चित्रपटात एक उपाय आहे. तसेच माझ्या या चित्रपटात हुंडा प्रथेवर तोडगा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

दिग्दर्शक आनल एल राय यांचा ‘रक्षा बंधन’ हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत भूमी पेडणेकर दिसणार आहे. अक्षय चित्रपटात 4 बहिणींचा भाऊ बनला आहे आणि त्यांच्या लग्नाच्या मागे आहे. ‘रक्षा बंधन’ व्यतिरिक्त अक्षय इमरान हाश्मी, नुसरत भरुचा आणि डायना पेंटीसोबत ‘सेल्फी’, जॅकलिन आणि नुसरतसोबत ‘राम सेतू’मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो ‘मिशन सिंड्रेला’, ‘ओएमजी 2’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्येही दिसणार आहे.

हे देखील वाचा