Saturday, June 29, 2024

अक्षय कुमारने त्याच्या ‘बेल बॉटम’ सिनेमासाठी घेतले दस्तुरखुद्द ‘या’ कलाकाराचे आशीर्वाद, फोटो इंटरनेटवर व्हायरल

टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो म्हणून ‘द कपिल शर्मा शो’ ओळखला जातो. या शोने आणि कपिलच्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करत त्यांचे भरभरून प्रेम मिळवले. लोकांना त्यांच्या व्यापातून काही आनंदाचे क्षण देणाऱ्या या शोचा सिझन फेब्रुवारीमध्ये बंद झाला.  तशा लगेचच हा शो पुन्हा कधी सुरु होणार या चर्चा रंगायला लागल्या. जेव्हा शोचे नवीन प्रोमो टीव्हीवर झळकायला लागले आणि लोकांना शो पुन्हा सुरु होणार या विचाराने हायसे वाटले.

‘कपिल शर्मा शो’चे नवीन प्रोमो आला त्यामुळे शो लवकरच सुरु होणार हे तर नक्की झाले, मात्र शोचा पहिला पाहुणा कोण असेल आणि शोचा पहिला भाग कधी प्रदर्शित होईल याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहे. मध्ये काही बातम्या आल्या की शो तर लवकर सुरु होणार असून, यात पहिला पाहुणा म्हणून अक्षय कुमार येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता यावरून खुद्द कपिल शर्मानेच पडदा हटवला आहे.(akshay kumar touch feet of kapil sharma)

कपिलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कपिल शर्मा आणि अक्षय कुमार दिसत असून, अक्षय कपिलचा नमस्कार करत असल्याचा हा फोटो आहे. कपिलने शेअर केलेला हा फोटो कपिल शर्मा शोच्या सेटवरील आहे. फोटो पोस्ट करताना कपिलने एक मजेशीर कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले, “सुप्रसिद्ध फिल्म अभिनेता श्री अक्षय कुमार त्यांच्या आगामी ‘बेलबॉटम’ सिनेमासाठी आशीर्वाद घेताना.” त्याचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला असून, सर्वत्र व्हायरल देखील झाला आहे. त्याच्या या फोटोवरूनच या शोमध्ये पहिला पाहुणा आता अक्षय कुमारचा येणार हे पक्के झाल्याचे सांगितले जात आहे.

कपिल शर्मा शोमध्ये प्रत्येक भागात वेगवेगळे कलाकार त्यांचे सिनेमे प्रमोट करण्यासाठी हजेरी लावतात. या सर्व कलाकारांमध्ये अक्षय कुमार हा या शोमध्ये सर्वात जास्त वेळा येणारा कलाकार ठरला आहे. वर्षाला ३/४ सिनेमे देणारा अक्षय नेहमीच शोमध्ये येतो. आता तो त्याच्या ‘बेल बॉटम’ सिनेमासाठी येणार आहे. लॉक डाऊननंतर ‘बेल बॉटम’ हा पहिलाच बिग बजेट सिनेमा असणार आहे, जो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

‘बेल बॉटम’ सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला असून, हा ट्रेलर सर्वांनाच आवडत आहे. अक्षयचा लूक, अक्षयचा अंदाज लारा दत्ताची इंदिरा गांधी यांची भूमिका आदी अनेक गोष्टींमुळे ट्रेलर चांगलाच चर्चेत आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा