Monday, July 1, 2024

अक्षय कुमारच्या रामसेतू चित्रपटाची शूटिंग पूर्ण, अभिनेत्याने केला टीमसोबत इमोशनल व्हिडिओ

अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. त्याच्या चित्रपटांची तसेच अभिनयाची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. अक्षयचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. चित्रपटासोबतच अक्षय त्याच्या सामाजिक कार्यक्रमामुळे ही नेहमीच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतो. सध्या त्याच्या ‘रामसेतू’ चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

अभिनेता अक्षय कुमारचे अनेक चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत ज्यामध्ये रामसेतु या महत्वाच्या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटाचं शूटिंग ३१ जानेवारीला पूर्ण झाले. याच आठवणीत अक्षयने चित्रपटाच्या सेटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो खूपच भावूक झाल्याचे पहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आपल्या चाहत्यांशी बोलताना दिसत आहे. ज्यामध्ये ”आज माझ्या ‘रामसेतू’ चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. रामसेतू तयार करण्यासाठी त्याकाळात वानर सेनेने काम केले होते. त्याचप्रमाणे माझ्या रामसेतु चित्रपटासाठी काम करणारी माझी ही वानरसेना आहे” अस म्हणतं त्याने कॅमेरा चित्रपटातील सह कलाकारांकडे फिरवल्याचे दिसत आहे. यावेळी चित्रपटातील सह कलाकारही आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आपल्या टीमसोबत केकही कापताना दिसत आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हा व्हिडिओ शेअर करत अक्षयने आपल्या चाहत्यांना खास आवाहनही केले आहे. या कॅप्शनमध्ये तो म्हणतो की ”आणखी एका दर्जेदार चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होत आहे. या दरम्यान खूप काही शिकायला मिळाले. हा पुन्हा शाळेत जाण्याचा अनुभव होता. आम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतले आहे. तुमच्या सर्वांचं प्रेम राहू द्या.”
हा व्हायरल व्हिडिओ अक्षयने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अवघ्या काही मिनिटातच तब्बल ३ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत जॅकलीन फर्णांडिस, नुसरत भरुचा, सत्यदेव यांनी भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. सध्या प्रेक्षकांना चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा