Friday, July 5, 2024

तो येतोय! कोरोना काळात चित्रीकरण पुर्ण झालेला रेकॉर्ड ब्रेक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाऊन नंतर परदेशात शुटींग झालेल्या बेल बॉटम चित्रपटाचे शुटिंग पुर्ण झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे लागलेले लॉकडाऊन संपल्यावर अक्षय कुमार व टीम बेलबॉटम प्रायव्हेट जेटने स्कॉटलंड येथे शुटसाठी गेले होते. यावेळी दोन शिफ्टमध्ये काम करत निर्धारित वेळेच्या आधीच सर्वांनी शुटिंग संपवले होते.

अक्षय कुमार हा अभिनेता शिस्तप्रिय कलाकार म्हणून ओळखला जातो. तसेच तो वेगाने काम करण्यासाठी चित्रपट सृष्टीत ओळखला जातो. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा बेल बॉटम चित्रपटाच्या शुटिंग वेळी आला आहे. एखाद्या चित्रपटाचे शुटिंग कोरोना काळात सुरु होऊन ते शुटिंग कोरोना काळातच संपलेला बेल बॉटम हा पहिला चित्रपट ठरला आहे.

शुटिंग संपताच या चित्रपटातील मुख्य अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटाचा एक खास पोस्टर शेअर केला. तसेच कोरोना व्हायरस या वैश्विक महामारीच्या काळात काम केलेल्या सर्व शुटिंग स्क्रूचे आभार मानले. “एकट्याने मिळून आपण थोड्याफार गोष्टी करु शकतो, परंतू एक टीम मिळून नक्कीच मोठे काम करु शकते. याचमुळे मी सर्व टीमचा आभारी आहे, ” असे अक्षयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“अशा एका चित्रपटामध्ये काम करणे हा एक खास अनुभव होता. आता मी अशा कोणत्याही टीमचा भाग नाही. सुरुवातीला मी विचार करत होते ही असं काम करणं किती कठीण आहे. परंतू आता मी सर्व टीमचे आभार मानते, ज्यांनी हा चित्रपट पुर्ण होण्यासाठी कष्ट घेतले, ” असे चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीची भुमिका निभावत असलेली वाणी कपूर म्हणाली.

हे देखील वाचा