Thursday, December 4, 2025
Home बॉलीवूड आनंद एल राय यांच्या ‘रक्षा बंधन’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण, अक्षय कुमारने शेअर केली भावुक पोस्ट

आनंद एल राय यांच्या ‘रक्षा बंधन’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण, अक्षय कुमारने शेअर केली भावुक पोस्ट

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार हिंदी चित्रपट जगतात आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमार इंडस्ट्रीमधील सगळ्यात यशस्वी आणि एकदम फिट अभिनेता म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमार त्याच्या एका पाठोपाठ एक प्रदर्शित होणार्‍या धमाकेदार चित्रपटामुळे इंडस्ट्रीमधील व्यस्त कलाकार म्हणूनही ओळखला जातो. अनेक कलाकार वर्षातून दोन तीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येतात परंतु अक्षय कुमार वर्षाला चार पाच सिनेमे करतो.

नुकतेच अक्षयने दिल्लीमध्ये त्याच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. निर्माता दिग्दर्शक आनंद एल राय यांचा हा चित्रपट जून महिन्यात फ्लोअर वर गेला होता. मुंबईमध्ये एका मोठ्या सेटवर चित्रीकरण पूर्ण केल्या नंतर दिल्लीमध्ये या चित्रपटाच चित्रिकरण पूर्ण झाले. चित्रपटात अक्षय कुमार सोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ११ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कथा हिमांशू शर्मा, कणिका ढील्लों यांनी लिहिली आहे.

अक्षयने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दोघांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघांच्या गप्पा रंगात आल्या आहेत. या सोबत अक्षयने ‘मी आणि आनंद राय यांनी रक्षा बंधन चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हेच केले. आम्ही इतके हसलोय जणू पुढचा दिवस उगवणारच नाही, परंतु आता चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा क्षण म्हणजे निराशेचा कटू रंग होता, नवीन दिवस, नवीन रोलर कोस्टर’ अशी भावूक पोस्ट त्याने लिहिली आहे.

याआधी अक्षयने फिल्म प्रॉडक्शन ४१ चे चित्रिकरण पूर्ण केले होते. या चित्रपटात अभिनेत्री रकूल प्रीतसिंग अक्षय कुमारसोबत झळकणार आहे. माध्यामातून समोर आलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि रकुल प्रीतचा हा चित्रपट विष्णु विशालचा लोकप्रिय तमिळ चित्रपट ‘Ratsasan’ चा हिंदी रिमेक आहे. ज्यामध्ये बाहुलीची मुख्य भूमिका आहे. मागच्या काही महिन्यापासून या चित्रपटाचे चित्रिकरण इंग्लंड मध्ये सुरू होते. या सिनेमाचे शूटिंग आता पूर्ण झाले आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘बेलबॉटम’ चित्रपटाचे निर्माते रंजीत तिवारी आणि जॅकी भगनानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. या चित्रपटाच नाव मात्र अद्याप निश्चित झाले नाही.

दरम्यान अक्षय कुमारचा दोन वर्षापासून प्रलंबित असलेला बहुचर्चित ‘सुर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांची यादी सुद्धा खुप मोठी आहे, ज्यामध्ये ‘पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’, ‘रामसेतू’, ‘ओह माय गॉड 2’ आणि ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात अक्षय झळकणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल

-कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’

-सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत

हे देखील वाचा