अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री वाणी कपूर यांचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. कोरोना काळामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे हा चित्रपट प्रदर्शनापासून वंचित राहत होता. अखेर बऱ्याच महिन्यांनी हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असताना . ‘बेल बॉटम’ १९ ऑगस्टला प्रदर्शित झाला. लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे.
नुकताच ‘बेल बॉटम’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि या चित्रपटासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला असून, डाऊनलोडसाठी देखील उपलब्ध झाला आहे. हा सिनेमा तमिल रॉकर्स, टेलीग्राम स्पाई-थ्रिलर पायरेटेड साइट्सवर HD फॉरमॅटवर उपलब्ध झाला आहे.
कोरोनाचा प्रभाव कमी झाला तसे महाराष्ट्राबाहेरील चित्रपटगृह सुरु झाले. आणि चित्रपटाच्या मेकर्सने हा सिनेमा ओटीटी ऐवजी चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित करण्याचे ठरवले. मात्र आता हा सिनेमा लीक झाल्याच्या बातमीने सर्वांची चिंता वाढवली आहे. या प्रकरणामुळे सिनेमाच्या टीमला मोठा तोटा होऊ शकतो. प्राप्त माहितीनुसार चित्रपटाची टीम यासर्व प्रकरणाविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे समजत आहे.
या सिनेमात अक्षय कुमार एका गुप्तहेराची भूमिका निभावत असून, ज्याचे कोडनाव ‘बेल बॉटम’ असते. एका मुलाखतीमध्ये अक्षयला या सिनेमाच्या सिक्वलबद्दल विचारण्यात आल्यावर त्याने सांगितले की, ‘सिनेमाचा शेवट पाहिला तर सिक्वलसाठी नक्कीच जागा आहे. चांगली स्क्रिप्ट आली तर भविष्यात ‘बेल बॉटम’ सिनेमाचा सिक्वल नक्कीच येऊ शकतो.’ असे तो म्हणाला.
सिनेमाच्या प्रदर्शनावरून अक्षयला विचारले की, हा सिनेमा स्वातंत्र्य दिनाच्या आठवड्यात का प्रदर्शित केला गेला नाही. रक्षाबंधनाचा आठवडा का निवडला? यावर तो म्हणाला, “हे मी नाही ठरवत हे आमचे निर्माते वाशु भगनानी यांनी ठरवले आहेत. ते नक्कीच अनुभवी आहेत, त्यामुळेच त्यांनी योग्य तारीख निवडली आहे.”
तत्पूर्वी सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगलीच पसंती दिली असून, बऱ्याच दिवसांनी मोठा सिनेमा चित्रपटगृहात पाहायला मिळाल्याने रसिक देखील खूप आनंदात दिसले. अक्षयने नक्कीच या चित्रपटाच्या माध्यमातून जोरदार धमाका केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका
-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ