अक्षय कुमार बॉलिवूडचा सर्वात फिट, शिस्तप्रिय आणि लोकप्रिय अभिनेता. त्याने आपल्या प्रभावी अभिनायच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. अक्षयने आपल्या अभिनय कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो एक उत्तम माणूस देखील आहे. बऱ्याचदा तो वेगवेगळ्या सामाजिक कार्यांमध्ये तो त्याचे योगदान देत असतो. आज (९ सप्टेंबर) रोजी अक्षय त्याचा ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र यावर्षी त्याच्या वाढदिवसाला दुःखाची किनार आहे. नुकतेच अक्षयच्या आईचे निधन झाले. आज अक्षय जो आहे, ज्या एवढ्या मोठ्या स्थानावर पोहचला आहे त्यात त्याच्या आईवडिलांनी मोठी भूमिका पार पाडली. आज अक्षयच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आई-वडिलांचे त्याच्या करियरमधील योगदान.
अक्षय कुमारला लहानपणापासूनच अभ्यासामध्ये फारसा रस नव्हता. अभ्यासासाठी त्याच्या वडिलांनी त्याच्यावर कधीच जास्त दबाव आणला नाही. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या चॅट शो ‘द अनुपम खेर शो’ मध्ये स्वतः अक्षय कुमारने हे सांगितले होते. त्याने त्याच्या अभ्यासाबद्दल सांगितले की, “मला सुरुवातीपासूनच अभ्यासात रस नव्हता. हेच कारण होते की जेव्हा मी माझं पुस्तक घेऊन वाचायला बसायचो, तेव्हा मला झोप यायची.”
या शोमध्ये अक्षय कुमारने असेे ही सांगितले की, “माझ्या वडिलांनी मला अभ्यासासाठी कधीही जबरदस्ती केली नाही. मला जे काही करायची इच्छा होती त्यात माझे वडील आनंदी असायचे. मी फक्त १२ वी पर्यंत अभ्यास करू शकलो. पुढे तो मार्शलआर्ट शिकण्याच्या उद्देशाने बँकॉकला गेला. या दरम्यान अक्षय कुमारने आपला खर्च भागवण्यासाठी हॉटेलमध्ये वेटरचे काम देखील केले.”
अनुपम खेर यांच्या शोमध्येच अक्षय कुमारने हे देखील उघड केले की, “माझ्या वडिलांकडे मला बँकॉकला पाठवण्यासाठी अजिबात पैसे नव्हते. मात्र त्यांनी मला पाठवण्यासाठी १८००० रुपयांचे कर्ज घेतले होते. मी बारावी उत्तीर्ण झाल्यावर मी बँकॉकला जाण्याचा निर्णय घेतला होता, तिथे जाऊन मला मार्शल आर्ट शिकायचे होते. मार्शल आर्ट शिकून मी काहीतरी करू शकेल असे मला वाटत होते. त्याकाळी तिथे जाण्यासाठी २२ हजार रुपयांचे तिकीट होते.”
अक्षय कुमार पुढे म्हणाला की, “मला अजूनही आठवते की त्या २२ हजार रुपयांपैकी १८ हजार रुपये माझ्या वडिलांनी कोणाकडून तरी कर्ज म्हणून उसने घेतले होते. त्यानंतर त्यांनी मला बँकॉकला पाठवले.” अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये १९९१ मध्ये ‘सौगंध’ या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अक्षय कुमारचा ‘खिलाडी’हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडला की, त्यानंतर विविध निर्माते आणि दिग्दर्शकांनी अक्षय कुमारसोबत ‘खिलाडी’ नावाने चित्रपट बनवले. पुढे तो ‘मोहरा’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘सुहाग’, ‘खिलाडीयों के खिलाडी’, ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’, ‘अजनबी’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘गरम मसाला’, ‘भागम भाग’, ‘सिंह इज किंग’, ‘खिलाडी ७८६’, ‘स्पेशल २६’, ‘गोल्ड’, ‘गुड न्यूज’ आदी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. अनेक चढ उतारांवर मात करत अक्षयने हे भरगोस आणि आभाळाएवढे यश मिळवले आहे. आज अक्षय चित्रपटांच्या बाबतीत, कमाईच्या बाबतीत, लोकप्रियतेच्या बाबतीत आदी अनेक गोष्टींमध्ये आज पुढे आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’
-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी
-‘लक्ष वेधण्यासाठी कपडे काढणे, हा माझा अजेंडा नाही’, म्हणत निया शर्माने ट्रोलिंगवर सोडले मौन










