Wednesday, July 3, 2024

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’चा हॉटस्टारवर बोलबाला, केला हा अनोखा विक्रम!

अभिनेता अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा सोमवारी ऑनलाइन दाखल झाला आणि डिस्ने प्लस हॉटस्टार या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की, चित्रपटाने प्रदर्शनाच्या काही तासांतच विक्रमाची नोंद केली. राघव लॉरेन्स दिग्दर्शित हा चित्रपट त्यांच्या ‘कांचना’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक असून यात आयशा रझा मिश्रा, शरद केळकर, तरुण अरोरा, अश्विनी काळसेकर, मनु रीषी चड्ढा, राजेश शर्मा आणि इतर कलाकार आहेत.

डिस्ने प्लस हॉटस्टारने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टवर असे म्हटले आहे की, “या चित्रपटाने रिलीजच्या काही तासातच बॉलीवूडच्या इतर कोणत्याही ब्लॉकबस्टरचे पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.” यापूर्वी डिस्ने प्लस हॉटस्टारने ‘दिल बेचराच्या’ रिलीजनंतरही अशीच घोषणा केली होती. “बॉलिवूडच्या सर्व चाहत्यांच्या मनामध्ये नेहमीच राहील असा हा चित्रपट. आपल्या प्रेमामुळे दिल बेचरा सिनेमाची आजवरची सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे.”

 

 

अक्षयने चाहत्यांचे आभार मानले आणि एका पत्रकार निवेदनात तो म्हणाला की, “लक्ष्मीला मिळालेल्या प्रतिसादामुळे मी भारावून गेलो आहे आणि मला अतिशय आनंद झाला आहे. हे ऐकून आनंद होतो की देशभरातील प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही तासातच पाहण्यासाठी डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपी वर लॉग इन केले. रेकॉर्ड मोडणे कोणाला आवडत नाही – मग ते बॉक्स ऑफिसवर असो किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर असो. या आनंदाच्या भावनेची कशाशीही तुलना करता येत नाही.”

हा चित्रपट प्लॅटफॉर्म वर येताच समीक्षांच्या नकारात्मक मतांवर उघडला आणि बहुतेक समीक्षकांनी ट्रान्सजेंडर समुदायाबद्दल असंवेदनशील असल्याबद्दल राग व्यक्त केला.

हे देखील वाचा