Wednesday, July 3, 2024

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चे नाव नेटकऱ्यांच्या तीव्र निषेधामुळे बदलले! जाणून घ्या काय आहे नवीन नाव

बऱ्याच विलंबानंतर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चा ट्रेलर ऑनलाईन प्रदर्शित करण्यात आला आणि प्रेक्षकांना आपल्या मजेदार आणि भयानक दृश्यांसह प्रभावित करण्यात यशस्वी देखील झाला. अक्षय कुमारच्या ट्रान्सजेंडरच्या भूमिकेने लोकांमध्ये बर्‍यापैकी उत्सुकता निर्माण केली आहे.

चित्रपटच्या सेन्सॉर प्रमाणपत्र आणि स्क्रिनिंग नंतर निर्मात्यांनी सीबीएफसीशी चर्चा केली. दर्शकांच्या भावना लक्षात घेऊन आणि त्यांचा मान ठेवून चित्रपटाच्या निर्माते – शबीना खान, तुषार कपूर आणि अक्षय कुमार यांनी आता त्यांच्या चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

करणी सेनेने सिनेमाच्या आधीच्या नावावर निषेध नोंदविला होता. त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली होती. तसेच, ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आता या सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला असेल असे म्हणायला हरकत नाही.

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी अभिनीत हॉरर-कॉमेडीचे नाव आता ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले आहे. निर्मात्यांनी चित्रपटाची नवीन पोस्टर्स नवीन शीर्षकासह अद्याप जाहीर केली नाहीत. ‘लक्ष्मी’चा प्रीमियर ९ नोव्हेंबर रोजी डिस्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी वर होणार आहे.

हे देखील वाचा