Tuesday, July 9, 2024

पंतप्रधान मोदींशी असलेली जवळीक अक्षय कुमारला पडली महागात, ‘#BoycottSuryawanshi’ सोशल मीडियावर ट्रेंड

अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट सर्वत्र धमाल करताना दिसत आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा चित्रपट शुक्रवारी (५ नोव्हेंबर) सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. त्याच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक होत आहे. परंतु पंजाब हे असे एक राज्य आहे, जिथे या चित्रपटाला अनेक संकटांचा सामना करायला लागत आहे. पंजाबमध्ये या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पंजाब शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. सोशल मीडियावर सध्या ‘बॉयकॉट सूर्यवंशी’ हा ट्रेंड चालू आहे. शेतकरी संघटनेने हा चित्रपट कितीतरी चित्रपटगृहात चालू करून दिला नाही. (Akshay Kumar’s sooryavanshi in panjab Kisan morcha did not allow the film to run in many theatres)

माध्यमातील वृत्तानुसार, बुढलाधामधील दोन चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्यांना अशी भीती आहे की, आंदोलन करणारे त्यांच्या संपत्तीचे नुकसान तर नाही ना करणार. त्यांना अशी भीती वाटत आहे की, जर त्यांनी हा चित्रपट चालू केला तर त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागेल. हाती आलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये अनेक ठिकाणी या चित्रपटाला होणारा विरोध वाढत आहे.

पंजाबमधील शेतकरी संघटनेने या चित्रपटाला पूर्णपणे बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, अक्षय कुमार हा सत्ताधारी पक्ष बीजेपीच्या खूप जवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे अक्षय कुमारच्या चित्रपटाला हा विरोध होत आहे आणि असे म्हटले जात आहे की, हा विरोध अजूनच वाढणार आहे. शेतकरी संघटनेने एकत्र सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे.

या आधी अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा देखील त्याला असाच विरोध केला होता. ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंग दिसत आहे. आता या चित्रपटाला विरोध केल्याने बॉक्स ऑफिसवर नक्की काय परिणाम होणार आहे. हे पाहणे महत्वाचे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

हे देखील वाचा