मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय सुंदर आणि सर्वानीच लाडकी जोडी म्हणजे राणा दा आणि पाठकबाई. अर्थात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. या दोघांनी डिसेंबर महिन्यांत लगीनगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला असून, या निमित्ताने हार्दिक आणि अक्षया गोव्याला फिरण्यासाठी गेले आहेत. गोव्याला जाण्यापूर्वी त्यांनी कोल्हापुरात जाऊन अंबाबाईचे दर्शन देखील घेतले.
अक्षया आणि हार्दिक यांनी गोव्याला गेल्यानंतर तिथले फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. यात समुद्र किनाऱ्याचा आणि त्यांच्या हॉटेलचा फोटो देखील आहे. अक्षया आणि हार्दिक यांनी २ डिसेंबर रोजी पुण्यामध्ये अगदी थाटामाटात लग्न केले. त्याआधी त्यांनी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर साखरपुडा करत त्यांनी सगळ्यांचा आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
याआधी अक्षया आणि हार्दिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघानीही त्यांची प्रेमकहाणी सांगितली आहे. हार्दिक जोशीच्या आईच्या पुढाकारानेच हे लग्न जुळून आल्याचे त्यांनी या विदेमध्ये कबूल केले. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपल्यानंतर हार्दिकच्या आईने त्याच्या मागे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. यातच त्यांनी हार्दिकला सांगितले की, “तुला जर अक्षया आवडते तर एकदा तिला विचारून बघ.” त्यानंतरच हार्दिकने अक्षयाला लग्नासाठी विचारले. अक्षयाने देखील तब्बल सहा महिने विचार करून मगच होकार कळवला. अक्षयाच्या आईने तर साखरपुडा आणि लग्नाच्या तारखा काढूनच हार्दिकच्या आईला फोन केला होता.
View this post on Instagram
तात्पर्य काय तर अक्षया आणि हार्दिक या दोघांच्याही लग्नाचे श्रेय हार्दिकच्या आईला जाते. प्रेक्षकांची रील लाईफमधली आवडती जोडी रियल लाईफमध्ये देखील एकत्र आली याचा त्यांना सर्वात जास्त आनंद झाला.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्गज अभिनेते सतीश शाह यांच्यावर झाली वर्णभेदावरून कमेंट, दिले सणसणीत उत्तर
इंजिनिअरिंग सोडून ‘या’ कलाकारांनी अभिनयात आजमावले नशिब, आज आहेत बॉलिवूडचे स्टार