‘तुझ्यात जीव रंगला’ या सुप्रसिद्ध मालिकेतून अक्षया देवधर घराघरात पोहचली. यात मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे, अक्षया यात बरीच साधी आणि सोज्वळ दाखवण्यात आली होती. मात्र ती खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. याची झलक तुम्हाला तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पाहायला मिळेलच. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहून तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. असाच तिचा भुरळ पाडणारा व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आले आहेत.
नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा अक्षयाचा मनमोहक अंदाज पाहायला मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षयाने निळ्या रंगाचा लॉंग ड्रेस परिधान केला आहे. उत्तम मेकअप आणि परफेक्ट हेअरस्टाईलने अभिनेत्रीच्या रुपात भर टाकली आहे. यात तिची सुंदरता अगदी पाहण्यासारखी आहे. (akshaya deodhar looking like angel in latest video)
हा व्हिडिओ अक्षयाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यातील तिचा भुरळ पाडणारा लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे. यातील अभिनेत्री सुंदरता अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. अगदी कमी कालावधीत या फोटोवर हजारो लाईक्स आले आहे. तसेच चाहते कमेंट्सच्या माध्यमातून तिच्या कौतुकांचे पूल बांधत आहेत.
अक्षयाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे तिला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली आणि याच मालिकेने अभिनेत्रीला घराघरात पोहचवले. या भूमिकेतून तिने अल्पावधीतच लाखो रसिकांची मने जिंकली आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मीरा जग्गनाथच्या अश्रूंचा फुटला बांध, गायत्री दातारला मिठी मारत मन केले मोकळे
-अभिनय क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कलारंभ २’ या अनोख्या अभिनय प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा
-सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक पद्धतीने जोडी अडकली लग्नबंधनात