Friday, July 5, 2024

करिअरच्या सुरुवातीला लतिकाने केलाय ‘या’ गोष्टींचा सामना, आईने दिला होता आत्मविश्वास

कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सध्या घराघरात पोहचली आहे. मालिकेतील पात्र आणि त्यांचे डायलॉग प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसत आहे. अशातच मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री अक्षया नाईक सगळ्यांना चांगलीच पसंती पडत आहे. तिचे लतिका नावाचे शांत, समंजस आणि विचारी पात्र अनेकांना आवडत आहे. तिच्या अभिनायाचे आता जरी कौतुक होत असले, तरी देखील करिअरच्या सुरुवातीला अनेक संकटाना सामोरे जावे लागले आहे. काही गोष्टींनी तिच्यातील आत्मविश्वास गेला होता आणि ती अगदी खचून गेली होती. परंतु तिच्या आईने तिला आत्मविश्वास दिला आणि ती आज काम करू शकत आहे.

याबाबत अक्षयाने तिचे काही मत व्यक्त केले आहे. याबाबत ती म्हणते की, “अगदी सुरुवातीच्या काळात मी थिएटरमध्ये काम करत होते. त्यावेळी एका व्यक्तीने मला सांगितले की, अभिनय तुझ्यासाठी बनलाच नाहीये. तू सोडून दे. तू या ग्रुपमध्ये नसली तरी आम्हाला फारसा काही फरक पडणार नाही. या एकाच वाक्याने मी पूर्णपणे खचून गेले. मला एकच माहित होत मला जे आवडत होत त्यात मला करिअर करायचं होतं.” (akshaya naik share her experiece begining of career)

हेही पाहा : सलमान सोबत बॉलिवूड मध्ये केलेले पदार्पण, मात्र सध्या विकेतेय घरोघरी जेवणाचे डब्बे | Pooja Dadwal

पुढे ती म्हणाली की, “या वाक्याने मी लगेच आईला कॉल केला आणि जे काही झालं ते सांगितलं. यावर ती घरी ये मग आपण बोलू असे सांगितले. घरी गेल्यावर मी जे काही घडलं ते सांगितलं. यानंतर आईने मला खूप आत्मविश्वास दिला. त्याच मुळे आज मी इथे आहे. जर आज आपल्याला काही गोष्टी येत नसतील परंतु ते सगळं करण्याचा स्पो असेल तर पुढे जाऊन आपण नक्कीच त्या गोष्टी मिळवू शकते. त्यामुळे असं खचायच नाही. असे मला आईने सांगितलं.”

यानंतर तिने सांगितले की, “या एका वाक्याने मला बळ आले आणि आज मी इथे आहे.” अशाप्रकारे तिने तिचा अनिभव शेअर केला आहे. सध्या तिची ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका जोरदार चर्चेत आहे. तिचा अभिनय देखील अनेकांना आवडत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा