अभिनेता अक्षय खन्नाला (Akshaye Khanna) आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने त्याच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट दिले असून, त्याचा अभिनय हीच त्याची ओळख आहे. अक्षय खन्ना हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा मुलगा असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. अक्षय खन्ना मंगळवारी (28 मार्च)ला त्याचा 47वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्याशी संबधीत किस्से…
साल 1997मध्ये आलेल्या ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. फिल्मी करिअरसोबतच अक्षयचे वैयक्तिक आयुष्यही अनेकदा चर्चेत आले आहे. त्याचे अभिनेत्री करिश्मा कपूरशी (Karishma Kapoor) लग्न होता होता राहिले आणि अभिनेत्याने आजपर्यंत लग्न केलेले नाही. आज आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत. (akshaye khanna and karishma kapoor would have gotten wedding but her mother interfered)
अक्षय खन्नाचा दुसरा चित्रपट होता ‘बॉर्डर’. बॉर्डर हा चित्रपट हिट ठरला, पण अक्षय खन्नाला ‘ताल’ चित्रपटातून खरी ओळख मिळाली. हा चित्रपट 1999 साली आला आणि सुपरहिट ठरला. या चित्रपटात अक्षयने अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत (Aishwarya Rai) रोमान्स केला होता. ‘दिल चाहता है’ या चित्रपटासाठी अक्षय खन्नाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर अक्षयने ‘हमराज’, ‘हंगामा’, ‘हलचल’, ‘रेस’ आणि ‘दहक’ या सिनेमांमध्ये काम केले.
अशातच अक्षय खन्नाचे नाव दोन-तीन अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. मात्र त्याच्या लग्नाची चर्चा अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत होती. करिश्माचे वडील रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी मुलीचे स्थळ विनोद खन्ना यांच्या घरी पाठवले होते. पण मधेच करिश्माची आई बबिता कपूर आली. त्यावेळी करिश्माचे करिअर शिखरावर होते. करिश्माने करिअरच्या या टप्प्यावर लग्न करावे, असे बबिता यांना वाटत नव्हते आणि त्यांनी हे नाते नाकारले.
अक्षय खन्ना एकदा त्याच्या लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर म्हणाला होता, “मला लहान मुले आवडत नाहीत, म्हणून मी आजपर्यंत लग्न केले नाही आणि मला कधीही लग्न करायचे नाही. मला एकटे राहणे आवडते. मी काही काळ नात्यात राहू शकतो, पण ते नातं जास्त काळ टिकवू शकत नाही.”
अक्षय खन्नाचे वडील विनोद खन्ना यांचे 2017 मध्ये निधन झाले. यानंतर अक्षय एकटा पडला. 46 वर्षाचा असूनही त्याने आजपर्यंत लग्न केलेले नाही. तर दुसरीकडे अक्षय खन्नाचे नाव चांगल्या अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट आहे, जो चांगला नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करू शकतो. अभिनेता शेवटचा ‘सेक्शन 375’ चित्रपटात दिसला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘उर्फी जावेद आहे ट्रान्सजेंडर’, ‘कोर्टातही सिद्ध करणार’, मॉडेलच्या दाव्याने सर्वत्र खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण
दोन-दोन वेळा संसार थाटणारे मराठी कलाकार आहेत तरी कोण?