Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड 28 वर्षांपूर्वी अक्षय खन्नाने गाजवलं होतं हेच गाणं, आता बॉर्डर 2वर ट्रोल झालेल्या वरुण धवनचं स्पष्ट प्रत्युत्तर

28 वर्षांपूर्वी अक्षय खन्नाने गाजवलं होतं हेच गाणं, आता बॉर्डर 2वर ट्रोल झालेल्या वरुण धवनचं स्पष्ट प्रत्युत्तर

वरुण धवन सध्या त्याच्या आगामी ‘बॉर्डर 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटातील क्लासिक गाणे ‘संदेशे आते हैं’ रिलीज झाले असून ते सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र या गाण्यातील वरुण धवनच्या एक्सप्रेशन्समुळे त्याला ओव्हरॲक्टिंगसाठी ट्रोलही करण्यात येत आहे. दरम्यान, ‘धुरंधर’ चित्रपटातील पॉवरफुल भूमिकेमुळे चर्चेत असलेला अभिनेता अक्षय खन्ना याच गाण्यावर तब्बल 28 वर्षांपूर्वी आपली छाप पाडून गेला होता. आता या ट्रोलिंगवर वरुण धवननेही स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे.

1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉर्डर’(Border) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत सुमारे 65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. या चित्रपटात अक्षय खन्नाने सेकंड लेफ्टनंट धरमवीर सिंग ही भूमिका साकारली होती. ‘संदेशे आते हैं’ या गाण्यातील त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. हा चित्रपट अक्षय खन्नाच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. डेब्यू फिल्म ‘हिमालय पुत्र’ फारशी यशस्वी ठरली नव्हती, मात्र ‘बॉर्डर’ने त्याला मोठी ओळख मिळवून दिली.

आता बॉर्डर 2’ पूर्णत्वास आली असून हा चित्रपट 23 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुनील शेट्टी यांच्या जागी त्यांचा मुलगा अहान शेट्टी दिसणार आहे. तसेच दिलजीत दोसांझ, वरुण धवन महत्त्वाच्या भूमिकेत असून सनी देओलही दमदार अवतारात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘संदेशे आते हैं’ गाण्यातील अभिनयामुळे ट्रोल होत असलेल्या वरुण धवनने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले. त्याने लिहिले, “मेजर होशियार सिंग दहिया… तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.”कमेंट सेक्शनमध्ये ट्रोलर्सना उत्तर देताना वरुण म्हणाला की,“तुमच्यामुळेच माझं गाणं हिट झालं, यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते?” दरम्यान, प्रेक्षकांमध्ये ‘बॉर्डर 2’ बद्दल उत्सुकता वाढली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

भाऊ फैसलच्या आरोपांवर आमिर खान प्रतिक्रिया; म्हणाला, “मी माझ्या कुटुंबाशी कसा लढू शकतो?”

हे देखील वाचा