अनेक बॉलिवूड अभिनेत्री आपल्या सुंदर आणि ग्लॅमरस फोटोंसाठी ओळखल्या जातात. त्याचबरोबर त्या सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. त्या नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. यामध्येच अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण अलाना पांडे देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अलाना पांडे ही अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण आहे. ती आपल्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. ती आपले अनेक हॉट फोटो शेअर करत असते. नुकतेच आता तिने आपले काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
अलानाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने बदामी रंगाच्या बिकिनीसह लाँग श्रग परिधान केला आहे. यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिने या अवतारात बोल्डनेसची हद्दच पार केली आहे. ती या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ देत आहे. एका फोटोत ती उभी राहिलेली दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोतही ती उभी राहून समोर पाहताना दिसत आहे. ज्यात तिचा कातील अंदाज दिसत आहे.
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर राडा केला आहे. तिच्या या फोटोंना चाहते प्रचंड प्रेम देत आहेत. या फोटोला आतापर्यंत ३७ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेक युजर्स तिच्या या फोटोंवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.
या फोटोवर एकाने कमेंट करत लिहिले की, “अलाना… तू पुढच्या सर्व लोकांचा भाग होणार आहेस… म्हाताऱ्यांनीही प्रेमात पडावे… तरुण लोक आतापासूनच भेटण्यासाठी मरत आहेत.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “उफ्फ सो हॉट.”
अलानाने या फोटोंसह एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यात ती घरातून बाहेर येताना दिसत आहे. या व्हिडिओत ती हळूवार दरवाजा उघडत बाहेर येते आणि स्विमिंग पूलकडे जाताना दिसते. स्विमिंग पूलकडे जाताना ती हळूवार आपला श्रग काढते आणि पाण्यात उतरते. तिची ही एन्ट्री चाहत्यांच्या मनावर भुरळ घालत आहे. तिचा हा कातील अंदाज पाहून चाहते बेभान झाले आहेत. तिच्या या फोटो आणि व्हिडिओला आतापर्यंत ६७ हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
यापूर्वी तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या फोटोत अलाना पांडेचा लूक एखाद्या जलपरीसारखा दिसत होता. तिने पारदर्शक ब्रा परिधान केली होती. ती समुद्राच्या पाण्याच्या मध्यभागी उभी दिसत होती आणि तिच्या हातात एक मोठा शंख होता. त्या शंखात पाणी भरून अलाना ते आपल्या अंगावर ओतत होती. हे फोटो एखाद्या काल्पनिक चित्रासारखे सुंदर दिसत होते. तिच्या या फोटोला देखील चाहत्यांनी प्रचंड प्रेम व प्रतिसाद दिला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बॉलिवूड अभिनेत्रींनी लुटला दिवाळीचा आनंद, सोबत दिसला प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा
-सुंदर! खुशी कपूरच्या कातिलाना अंदाजाने लावले चाहत्यांना वेड, फोटोशूटमध्ये कैद झाला ‘सिक्रेट टॅटू’