नवी दिल्ली। शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरेने दुबई येथे आपला वाढदिवस साजरा केला. त्याच्या या वाढदिवसाच्या पार्टीला अभिनेत्री अलाया फर्नीचरवालाने हजेरी लावली होती. यानंतर ती दीर्घकाळानंतर सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागली.
ऐश्वर्यची आई स्मिता ठाकरे यांनी पार्टीदरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये अलाया या वाढदिवसाच्या पार्टीचा भाग असल्याचे सांगितले.
ऐश्वर्यनेही त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर वाढदिवसाच्या पार्टीची स्टोरी ठेवली. त्यात त्याने त्याची आई स्मिता ठाकरे आणि अलायालाही टॅग केलेे होते. सोबतच हर्टचा इमोजीचाही समावेश केला.
यादरम्यानचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. नोव्हेंबर २०१९ मध्ये ऐश्वर्यने अलायाच्या २२ व्या वाढदिवसाच्या वेळी आपल्या मित्रांसमवेत हजेरी लावली होती.
अलाया ही अभिनेत्री पूजा बेदी आणि फरहान फर्निचरवाला यांची मुलगी आहे. असे असले तरीही त्यांचा आता घटस्फोट झाला आहे.
अलायाने २०२० मध्ये ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात सैफ अली खान, तब्बू या सुपरस्टार अभिनेत्यांचा समावेश होता.