Wednesday, July 3, 2024

नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ; एकदा पाहाच

बॉलिवूड अभिनेत्री आणि पूजा बेदी यांची मुलगी अलाया फर्निचरवाला आजकाल चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील चांगली ऍक्टिव्ह असल्याचे दिसून येतंय. अलीकडेच तिने एक हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले आहे. तिने आपल्या फोटोमुळे प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच भुरळ पाडली असल्याचे दिसतंय.

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अलायाने न्यूयॉर्क फिल्म अकादमीमध्ये अभिनयात डिप्लोमा केला होता.
अलायाने मागील वर्षाच्या सुरुवातीला सैफ अली खानसोबत ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने सैफ अली खानच्या मुलीची भूमिका केली होती आणि तब्बू ही अलायाच्या आईच्या भूमिकेत दिसली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना देखील चांगलीच पसंतीस पडली. अलायाच्या पदार्पणाबद्दल तिचे कौतुक सुद्धा केले गेले होते.
सध्या अलाया यावेळी कोणत्याही चित्रपटातून नव्हे, तर आपल्या ग्लॅमरस फोटोशूट द्वारे लोकांच्या चर्चेचा विषय बनत चालली आहे.

अलाया हिचे फोटोशूट काही नवीन नाहीत. बऱ्याच वेळा तिने खूप फोटो शूट केले होते. पण तिने आता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण अलायाचा बोल्ड अवतार पाहू शकता. तिने ‘मी नेहमी टेबलावर अशीच बसते,’ अशा फोटोसह तपशील दिला आहे.

अलाया हिने सैफ अली खानसोबत केलेल्या चित्रपटात एकविसाव्या वर्षी प्रथमच तिच्या वडिलांना भेटणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये तिचे काम प्रेक्षकांना खूपच आवडले लाया फर्निचरवाला हिला अभिनयाबरोबरच नृत्याची देखील फार आवड आहे. तिच्या डान्सचे व्हिडिओ ती नेहमीच सोशल मीडिया शेअर करत राहते, नुकताच तिने ‘कलंक’ या गाण्यावर परफॉर्मन्स करताना एक इंस्टाग्राम रील शेअर केले होते.

सध्या अलाया ही एका आणखी नवीन चित्रपटामध्ये काम करत आहे. या चित्रपटाचे नाव ‘गजब कहाणी’ हे असून या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर, आदित्य सील आणि अमृता पुरी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

ऐकावे ते नवल! बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाच्या वाढदिवसाला ‘या’ अभिनेत्रीने दुबईत लावली हजेरी; पाहा फोटो

हे देखील वाचा