मित्रांनो सोशल मीडिया हे एक असे माध्यम अहे जाते माणसाच्या कलागुणांना वाव मिळतो. अनेक नवीन लोकांशी जोडण्याची संधी मिळते. एखादी गोष्ट सोशल सोशल मीडियावर चुटकीसरशी व्हायरल होतात पण काही गोष्टी व्हायरल व्हायला वेळ लागतो. असच काहीसं गायक अली जाफर (ali jafar) याच्याबद्दल झाले आहे. सध्या आपण जर इंस्टाग्रामवर पाहिले तर एक गाणे चांगेलच व्हायरल लागले, ते गाणे म्हणजे ‘झूम’. ‘मैने तुझे देखा हसते हुए गालोंमे’ हे बोल असणारे गाणे सगळ्यांना आवडत आहे. सोशल मीडियावे या गाण्याने थैमान घातले आहे. गाण्यावर प्रचंड रिल्स बनत आहेत.
परंतु या गाण्याबद्दल एक गोष्ट अनेकांना माहित नसेल की ११ वर्षांपूर्वी म्हणजेच २०११ मध्ये प्रदर्शित झाले होते. ते गाणे क्लासिकल स्टाईलचे होते. ते जुने गाणे देखील अली जाफरने गायले होते. परंतु अनेकांना ते गाणे माहित देखील नव्हते. परंतु अनेक वर्षांनी हे गाणे अचानक सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले. या गोष्टीची आयडिया अलीला देखील नव्हती की, हे गाणे एवढे व्हायरल होईल. या गाण्याचे १० दिवसात तब्बल २० लाख रिल्स बनवले गेले आहेत. अशातच अलीने नुकतेच या गाण्याचा ११ वर्षाचा प्रवास मांडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, यात त्याने गाण्यावरील सगळे रिल्स टाकले आहेत. ज्यात वेग वेगळे कलाकार दिसत आहे.
हा व्हिडिओ युट्यूबवर शेअर करून त्याने एक भले मोठे कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले आहे की, “११ वर्षांनंतर, तेच गाणे केवळ १० दिवसांत केवळ इन्स्टाग्रामवर २००,००० हून अधिक चाहत्यांच्या व्हिडिओसह जगभरात लोकप्रिय झाले. अधिकृत व्हिडिओ हा यातील काही व्हिडिओंचे संकलन आहे, जो त्याच कल्पनेचे प्रतिनिधित्व करतो… की आपण सर्व जण एका तारातील मोत्यासारखे एकमेकांशी जोडलेले आहोत.
त्याने पुढे लिहिले की, “एकमात्र गोष्ट जी आपल्याला वास्तविकतेच्या आपल्या मर्यादित आकलनात वेगळे करते. त्यापलीकडे संगीताद्वारे स्वतःला व्यक्त करणे आणि स्वातंत्र्य आणि प्रेम आहे.” अली जफर.”
त्याने शेअर केलेला या व्हिडिओमध्ये तो ‘झूम’ गणायचे नवीन व्हर्जन गाताना दिसत आहे. ज्यात वेगवेगळे कलाकार आणि रिल्स स्टार डान्स करताना दिसत आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने हा व्हिडिओ तयार केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- बापरे.! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने जिंकला पत्नीविरोधातला मानहानीचा खटला, आता भरपाई म्हणून मिळणार तब्बल ‘इतके’ कोटी
- जेव्हा सोनाली बेंद्रेने पैशासाठी केले होते ‘अशा’ चित्रपटात काम, स्वतः केला खुलासा | sonali bendre
- ‘पृथ्वीराज सम्राट’ प्रदर्शित होण्यापूर्वीच अक्षय कुमार म्हणाला, ‘आम्हाला भारतीय राजांपेक्षा आक्रमणकर्त्यांबद्दल अधिक…’