Monday, July 8, 2024

वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर रणबीरने आलियासोबत घेतला जंगल सफारीचा आनंद, व्हिडिओ आणि फोटो व्हायरल

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट होतात . ते नेहमीच त्यांच्या अफेअरमुळे चर्चेचा विषय ठरतात. रणबीर कपूरने नुकताच त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अभिनेता वाढदिवस साजरा करण्यासाठी गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत जोधपूरला पोहोचला. रणबीरने आपला वाढदिवस आलियासोबत एकांतात आणि खासगी पद्धतीने साजरा केला. रणबीर आणि आलिया सोशल मीडियावर बर्‍यापैकी सक्रिय असतात. अनेकादा ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असतात. अशातच त्यांच्या जोधपूर ट्रिपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवर रणबीर आणि आलियाच्या फॅनपेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, सोबतच त्यांच्या जंगल सफारीचे काही फोटो देखील आहे. रणबीर आणि आलियाने जोधपूर येथे रणबीरचा वाढदिवस साजरा केल्यानंतर जंगल सफारीचा आनंद घेतला. या व्हिडिओत आलिया आणि रणबीर जिपमध्ये फिरताना दिसत आहे. दोघेही जोधपूरच्या जवळच असलेल्या सुजान जवाई कॅम्पमध्ये दिसले. या कॅम्पमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये आलियाही दिसत आहे. यावेळेस त्यांनी फॅन्ससोबत फोटो देखील काढून घेतले.

या सफारी दरम्यान, आलिया भट्टने पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली असून, रणबीर कपूर ब्लॅक आउटफिट आणि कॅपमध्ये दिसला. रणबीरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे दोघे पालीतील सुजान जवाई रिसॉर्टमध्ये गेले होते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर रणबीर आणि आलिया लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत . या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, आलिया ‘रॉकी और रानी की लव्ह स्टोरी’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘आरआरआर’, ‘डार्लिंग’ तर रणबीर कपूर ‘शमशेरा’, ‘ऍनिमल’मध्ये दिसणार आहे . रणबीर कपूरच्या वाढदिवसाचे निमित्त साधून यशराजने ‘शमशेरा’ सिनेमातील त्याच्या लूकचे पोस्टर प्रदर्शित केले.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘असं रूप आणि शृंगार असल्यास कोणासही येड लागेल’, म्हणत चाहत्यांनी केले अक्षयाच्या सौंदर्याचे कौतुक

बॉलिवूडमधील ‘या’ चित्रपटांमध्ये जेठालाल यांनी साकारल्या होत्या लहान-मोठ्या भूमिका, आज आहे टेलिव्हिजनवरील सुपरस्टार

‘या’ सुपरहिट चित्रपटांसाठी ‘या अभिनेत्री होत्या पहिली पसंती, कोणी प्रेग्नन्सीमुळे तर कोणी ब्रेकअपमुळे सोडले सिनेमे

 

हे देखील वाचा