Saturday, June 29, 2024

आलिया भट्टच्या लाईव्ह सेशनमध्ये दिसला रणबीर कपूरअन् तो पण विना शर्ट, एकदा पाहाच हा व्हिडिओ

लॉकडाऊन दरम्यान अनेक कलाकार सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत, तर काहीजण लाईव्ह सेशन मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील चाहत्यांसोबत लाईव्ह सेशनवर बोलत होती. तेव्हा ती काय बोलत आहे यापेक्षा प्रेक्षकांचे लक्ष तिच्या आजूबाजूला जास्त होते. त्यावेळी प्रेक्षकांना तिच्या रूममध्ये रणबीर कपूर दिसला. यावरून सगळे तिला कमेंट करून विचारत आहेत.

आलिया भट्ट जेव्हा तिचे प्राणी प्रेम आणि निसर्ग प्रेमाबद्दल बोलत असते, तेव्हा तिथे तिच्यामागे असणाऱ्या आरश्यामध्ये रणबीर कपूरची प्रतिकृती दिसते. आलियाच्या चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, तो रणबीर कपूर होता. त्याच्याकडे बघून देखील असे वाटत आहे की, तो रणबीर कपूर आहे. यामध्ये त्याने शर्ट घातलेला नाहीये, तेव्हा तिच्या एका चाहत्याने कमेंट केली की, ‘तो बघ मागे रणबीर कपूर विना शर्ट आहे.’ यावर अनेकजण मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे लॉकडाऊनमध्ये एकत्र राहिले होते. रणबीरला कोरोनाची लागण झाल्यानंतर काही दिवसांनी आलियाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, तर रणबीरच्या आईने म्हणजे नीतू कपूर यांनी देखील सांगितले की, त्या एकट्याच राहत आहेत. त्यांना त्यांची प्रायव्हसी खूप आवडते. त्यांची मुले त्यांना भेटायला येत असतात.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या 3 वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची खूप उत्सुकता आहे. एका मुलाखतीत रणबीर कपूरने सांगितले होते की, कोरोना नसता तर आता त्यांचे लग्न झाले असते. आलिया आणि रणबीरने ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. सगळेजण आता त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान

-बॉलिवूडमधील ‘काटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाने केले बिकिनीमधील फोटो शेअर, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

-अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीच्या जबरदस्त व्हिडिओवरून हटेना चाहत्यांची नजर; पाहा तिची मोहक अदा

हे देखील वाचा