Monday, July 8, 2024

आलियाच्या ‘ढोलिडा’पासून दीपिकाच्या ‘घूमर’पर्यंत, भन्साळींनी ‘या’ चित्रपटांत दाखवलीय भारतीय संस्कृतीची झलक

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचे चित्रपट केवळ त्यांच्या कथांसाठीच ओळखले जात नाहीत, तर त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडते, जे वर्षानुवर्षे लक्षात राहतात. यासोबतच, संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट भव्य सेट आणि आकर्षक पोशाखांसह त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींसाठी देखील ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटांच्या सेटमध्ये भारतीय भव्यता दिसते. भन्साळींचे असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांच्या गाण्यांमध्ये भारतीय पारंपारिक नृत्याची झलक आहे आणि या सर्व गाण्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. जाणून घेऊया अशाच काही गाण्यांबद्दल…

गंगूबाई काठियावाडी- ढोलीडा
आलिया भट्ट (Alia Bhatt) अभिनित ‘गंगूबाई काठियावाडी’चे पहिले गाणे नुकतेच रिलीझ झाले असून, त्यात ती जबरदस्त गरबा डान्स करताना दिसत आहे. या गाण्याच्या डान्समधून गुजरातच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडते. (alia bhatt garba to deepika padukone ghoomar sanjay leela bhansali brings indian culture)

पद्मावत- घुमर
संजय लीला भन्साळी यांनी ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘घूमर’ या गाण्यातून राजस्थान किती सुंदर आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. चित्रपटाचा भव्य सेट आणि दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) वेशभूषा पाहण्यासारखी होती. या सर्व गोष्टी अतिशय बारकाईने आखल्या गेल्या. ‘घूमर’ या गाण्यात दीपिकाने घातलेला लेहेंगा ३० किलो वजनाचा होता. जो तिने सोन्याच्या जड दागिन्यासोबत घातला होता आणि या गाण्यात दीपिकाने ६६ फेऱ्या मारल्या. त्यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

रामलीला- नगाड संग ढोल बाजे
‘नगाड संग ढोल बाजे’ या गाण्यातही संजय लीला भन्साळी यांनी पारंपारिक ट्रॅक निवडला आणि दीपिका पदुकोणनेही ते उत्तमरीत्या साकारले आहे. तिने आपल्या शानदार नृत्याने या गाण्यात जीव ओतला आणि हे गाणे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले.

बाजीराव मस्तानी- पिंगा
संजय लीला भन्साळी यांचे पारंपारिक संगीतावरील प्रेम ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा’ या गाण्यातूनही दिसून आले. ‘बाजीराव मस्तानी’च्या या गाण्यात दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) एकत्र दिसल्या होत्या. टिपिकल महाराष्ट्रीयन साड्या, नथ, पारंपारिक हिरव्या काचेच्या बांगड्या, चंद्रकोर आकाराची बिंदी. एकंदरीत या गाण्यातून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडते.

देवदास- डोला रे डोला

संजय लीला भन्साळी २००२मध्ये ‘देवदास’ हा हिट चित्रपट घेऊन आले. यातील ‘डोला रे डोला’मध्ये ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांनी बंगालच्या लोककथेचे उत्तम सादरीकरण केले.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा