आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या खूप आनंदी आणि तिला स्वतः चा अभिमान वाटत आहे. कारण तिचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आलिया आणि संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
अशातच आलिया भट्ट बहिण शाहीन भट्टसोबत ७२व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेली आहे. या ठिकाणी तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर आहे. यादरम्यान आलियाच्या परफेक्ट एअरपोर्ट लूकने चाहत्यांना आकर्षित केले. यावेळी आलियाने संपूर्ण पांढरा पोशाख परिधान केला होता आणि त्यासोबत पांढरे बूट घातले होते. (alia bhatt jets off with shaheen bhatt to attend berlin international film festival as her movie)
रिपोर्ट्सनुसार, आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट बर्लिन स्पेशल सेगमेंटमध्ये दाखवला जाणार आहे. या विभागात, आयोजक साथीच्या काळात चित्रित केलेले चित्रपट प्रदर्शित करतील. काही दिवसांपूर्वीच ‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर रिलीझ झाला असून, तो खूप पसंत केला जात आहे. संजय लीला भन्साळीसोबत आलियाचा हा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.
आलिया या चित्रपटात गंगूबाई या कोठेवालीची भूमिका साकारत आहे. जिला तरुण वयात वेश्या व्यवसायात विकले गेले. चित्रपटात आलिया भट्टशिवाय विजय राज, इंदिरा तिवारी आणि सीमा पाहवा दिसणार आहेत. तर अजय देवगण, इमरान हाश्मी आणि हुमा कुरेशी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
‘गंगुबाई काठियावाडी’ २५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनाआधीच चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. निर्मात्यांनी या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित केले असून, हे’ ढोलिडा’ गाणे प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. फक्त २ तासातच या गाण्याला तब्बल ४३ हजार वेळा पाहिले गेले आहे. ‘ढोलिडा’ हे चित्रपटातील एक गरबा गाणे आहे ज्यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट ढोलाच्या तालावर डान्स करताना दिसत आहे.