Saturday, July 6, 2024

आलिया भट्टला मिळाली अजून एक मोठी उपलब्धी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘या’ यादीत मिळवले मानाचे स्थान

बलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्री म्हणून आलिया भट्टला ओळखले जाते. आजपर्यंत सर्वच भूमिका तिने अतिशय प्रभावी पद्धतीने साकारल्या आहेत. आलियाच्या उत्कृष्ट अभिनयाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ओळख मिळाली आहे. तिने २०२३ या वर्षातील सर्वात प्रभावशाली आंतरराष्ट्रीय स्त्रियांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

या यादीमध्ये आलियासोबतच अनेक मोठे नाव देखील सामील आहेत. यामध्ये एचबीओ हिट हाऊस ऑफ़ द ड्रॅगनची अभिनेत्री मिल्ली एल्कॉक, एमिली केरी, ओलिविया कुक, एम्मा डी’आर्सी, सोनोया मिज़ुनो यांसोबतच स्पेनिश अभिनेत्री रोजालियाचा देखील समावेश करण्यात आला आहे. यादीमध्ये अशा देखील महिला आहेत, ज्यांनी त्यांचे योगदान आंतराराष्ट्रीय स्तरावर दिले आहे. तिचे नाव यादीमध्ये समाविष्ट झाल्याची माहिती खुद्द आलियानेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरी अकाऊंटवरून दिली आहे. तिच्या या उपलब्धीवर तिच्या फॅन्ससोबत बॉलिवूडमधील कलाकार देखील खुश असून, ते सध्या तिला शुभेच्छा देत आहेत.

तत्पूर्वी सध्या आलिया तिच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमाची शूटिंग काश्मीरमध्ये करत आहे. ती सध्या काश्मीरमध्ये तिच्या आई सोनी राजदान, बहीण शाहीन भट्ट आणि मुलगी राहासोबत या गाण्याची शूटिंग करत आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणारा आहे. येत्या २८ जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून, यात धर्मेंद्र, शबाना आजमी आणि जया बच्चन देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय आलिया प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ यांच्यासोबत ‘जी ले जरा’ची देखील शूटिंग करणार आहे. तिच्यासाठी २०२२ हे वर्ष खूपच खास होता यावर्षी तिचे गंगूबाई काठियावाड़ी, आरआरआर आणि ब्रह्मास्त्र हे तीन सिनेमे आले आणि तिघेही हिट गेले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्गज पाकिस्तानी कलाकार कवी खान यांचे कॅन्सरमुळे दुःखद निधन

उफ्फ! रुबीना दिलैकचा ग्लॅमरस अंदाज, पाहणऱ्याचीही उडेल झाेप

हे देखील वाचा