Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड जबरदस्त ऍक्शनने परिपूर्ण ‘आरआरआर’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, दिसली एसएस राजामौलीच्या चित्रपटाची भव्यता

जबरदस्त ऍक्शनने परिपूर्ण ‘आरआरआर’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, दिसली एसएस राजामौलीच्या चित्रपटाची भव्यता

चित्रपटगृह सुरू झाल्यामुळे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक बिग बजेट सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहे, काही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, तर काही चित्रपटांचे शूटिंग अखेरच्या टप्प्यात आले आहे. अशातच अनेक पूर्ण झालेल्या चित्रपटाचे ट्रेलर आणि टिझर प्रदर्शित होत आहेत. यातच नुकताच बहुप्रतिक्षित अशा ‘आरआरआर’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सिनेमाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. याशिवाय या चित्रपटात असणारी कलाकारांची फौज हीच उत्सुकता शिगेला नेत आहे.

आरआरआर चित्रपटाचा प्रदर्शित झालेला टिझर ४५ सेकंदांचा असून, या पूर्ण ४५ सेकंदांमध्ये फक्त कलाकार दाखवण्यात आले आहे. पार्श्वसंगीतावर असणाऱ्या या टीझरमध्ये कोणताही संवाद ऐकायला मिळत नाही. ज्युनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगन, आलिया भट्ट यांचे दर्शन या टीझरमधून घडत आहे. या छोट्या टीझरमध्येही या सर्वांच्या आकर्षक भूमिका आणि त्याच्या दमदार अभिनय प्रेक्षकांचे मनं जिंकून घेण्यात यशस्वी झाला आहे.

या टीझरचे अजून एक मुख्य विशिष्ट्य म्हणजे चित्रपटाची भव्यता, मोठमोठे सेट्स आणि जबरदस्त व्हीएफएक्स. या टीझरमध्ये या सर्व गोष्टी प्रकर्षाने दिसून येतात. बाहुबली चित्रपटाच्या अमाप यशानंतर प्रेक्षकांना एसएस राजामौली यांच्याकडून अशा काहीशा धमाकेदार चित्रपटाची अपेक्षा होती. आता आरआरआर चित्रपटाचा टिझर पाहून हा सिनेमा देखील बाहुबली इतकाच यशस्वी होणार यात कोणतीच शंका नाही. हा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल झाला असून, सर्वांच्या त्यावर भरपूर कमेंट्स येत आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आलिया भट्ट आणि अजय देवगण दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. हा सिनेमा येत्या ७ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा १३ ऑक्टोबर २०२१ ला प्रदर्शित होणार होता मात्र कोरोनामुळे या चित्रपटाची शूटिंग लांबली आणि पर्यायाने प्रदर्शनही लांबले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ दिवशी रेशीमगाठीत अडकणार राजकुमार राव अन् पत्रलेखा, जाणून घ्या लग्नाची संपूर्ण माहिती

-आलिया- रणबीर अन् कॅटरिना- विकीच्या आधी राजकुमार अन् पत्रलेखा थाटणार आपला संसार; मित्रांना पाठवले निमंत्रण?

-राजकुमारच्या आईची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण; निधनानंतर अमिताभ यांनी अभिनेत्याला पाठवला होता व्हिडिओ

हे देखील वाचा