Wednesday, June 26, 2024

आलियानंतर राम चरणचा ‘या’ चित्रपटातील लूक व्हायरल, मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

या दिवसात बॉलिवूडसोबतच इतर चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे चित्रपट खूपच चर्चित आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील चित्रपटाची चांगली कमाई होताना दिसत आहे. यातच आणखी एका चित्रपटाची चर्चा जोरदार सुरू आहे. हा चित्रपट अजून रिलीज झाला नाही. केवळ अभिनेत्रीच्या एका लूकने सीनेप्रेमी चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. एसएम राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र चालू आहे. या चित्रपटातील आलिया भट्टचा लूक मागे रिलीज झाला होता. तिच्या या लूकला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद येताना दिसला होता.

नुकताच साऊथ सुपरस्टार राम चरण याचा ‘आरआरआर’ या चित्रपटातील त्याचा लूक पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याच्या या लूकची प्रेक्षकांमध्ये खूपच चर्चा चालू आहे. या फोटोत तो हातात धनुष्य बाण घेतलेला दिसत आहे.

अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आरआरआर या चित्रपटातील राम चरण याचा पहिला लूक शेअर केला आहे. या लूकमध्ये राम एका साधूच्या रुपात दिसत आहे. त्याने हातात धनुष्य बाण धरला आहे आणि मागे युद्धाचा सीन दाखवला आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक जखम देखील दिसत आहे. त्याचा हा लूक शेअर करत आलियाने लिहिले की, “तेजस्वी, ताकदवान आणि साहसी, हे आहेत सीतेचे रामराजू.”

आलिया भट्ट या चित्रपटातून साऊथमध्ये प्रवेश करत आहे. ती आरआरआर या चित्रपटात राम चरण याची पत्नी सिताच्या भूमिकेत दिसणार आहे. राम चरण या चित्रपटात अल्लरू सीताराम राजू ही भूमिका निभावणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील सिंघम म्हणजे अजय देवगण देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ

-रश्मिका आणि कार्ती यांच्या बहूचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत

-भोजपुरी स्टार राकेश मिश्राने केला अक्षरा सिंगसोबतचा ‘थ्रोबॅक’ फोटो शेअर, सोशल मीडियावर होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा