बॉलिवूड सेलिब्रिटीज बहुतेकदा आपल्या लूकमुळे चर्चेत असतात. खासकरून जेव्हा जेव्हा सेलिब्रिटीज बिकिनी आणि बीच ड्रेस घालतात, तेव्हा बरीच चर्चा होते व फोटोही व्हायरल होतात. नुकतेच आलिया भट्टने तिचे समुद्र किनाऱ्यावरील बिकिनीवरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरु आहे.
आलिया भट्ट सध्या तिच्या मित्रांसोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. चित्रपटाच्या शूटिंगमधून वेळ काढून आपल्या मित्रांसोबत ती वेळ घालवत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये आलियाने विविधरंगी बिकिनी परिधान केली असुन यात ती खूपच आकर्षक आणि हॉट दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने ‘निळा समुद्र आणि मासे’ असे लिहले आहे.
आलिया भट्टने सोशल मीडियावर तिच्या गर्ल गँगसोबत बरेच फोटो शेअर केले आहेत. युरोप आणि ग्रीकनंतर आता आलिया आपली बहीण शाहीन आणि मैत्रिणींसोबत मालदीवला गेली आहे. तेथे ती खूप मजा करताना दिसत आहे. बीचवरील हॉट ड्रेसच्या फोटोवर चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या. कोणी लिहिले ‘मला थंड श्वास घेऊ द्या’, तर कोणी म्हणाले, ‘हा फोटो नक्कीच रणबीरने घेतला असेल’.
आलियाने यापूर्वीही काही फोटो शेअर केली होते. ज्यात ती आपली बहीण शाहीन आणि मैत्रिणींबरोबर दिसली होती. त्यांचा स्विमिंग पूलचा फोटोही नेटिझन्सच्या चर्चेत होता. काही तासांतच फोटोला लाखो लाईक्स मिळाले होते.
आजकाल आलिया आणि रणबीर कपूरच्या अफेअरच्या बातम्या जोरात सुरू आहेत. त्यांच्या लग्नाच्याही बातम्या येऊ लागल्या आहेत. त्याच वेळी, भुतकाळाचा विचार केला तर तुम्हाला कटरिना कैफ नक्कीच आठवेल. कदाचित तुमच्यातील काहीजणांना हेही आठवेल, जेव्हा रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कटरिनाने बीचवर बिकिनी परिधान केली होती आणि तेव्हा रणबीरसोबत तिचा फोटो देखील व्हायरल झाला होता, त्यानंतर तिने अतिशय रागाने प्रतिक्रिया व्यक्त केली होती.