Saturday, July 6, 2024

आलिया भट्टने दिली आणखी एक गूड न्यूज! वाचून तुम्हीही व्हाल आनंदित

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणाची घोषणा करून चाहत्यांना आनंदित केले. त्याचवेळी, आता आलियाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे अशी माहिती शेअर केली आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. आलियाने तिच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवरून सांगितले आहे की, तिच्या आगामी ‘डार्लिंग’ चित्रपटाचा टीझर कधी प्रदर्शित होणार आहे.

‘या’ दिवशी रिलीझ होणार टीझर
आलियाने सोमवारी (४ जुलै) सोशल मीडियावर एक छोटीशी क्लिप तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली. ही व्हिडिओ क्लिप तिच्या आगामी ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाशी संबंधित आहे. या क्लिपसह आलियाने सांगितले की, याचा टीझर उद्या म्हणजेच मंगळवारी (५ जुलै) रिलीझ होणार आहे. आलियाने लिहिले, “लिटिल डार्क लिटिल कॉमेडी… डार्लिंग्सचा टीझर उद्या येत आहे.” (alia bhatt starrer darlings teaser out tommorow)

इथे पाहा पोस्ट

नेटकरी भरभरून करतायच कमेंट्स
आलियाच्या या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीच्या पोस्टवर जोरदार कमेंट करत आहेत. या क्लिपवर एका चाहत्याने लिहिले की, “उद्यापर्यंत प्रतीक्षा करू शकत नाही.” त्याच वेळी, दुसर्‍या चाहत्याने लिहिले, “मी ओरडत आहे…आता अजून थांबू शकत नाही…लव्ह यू डार्लिंग्स.” याशिवाय, बहुतेक यूजर्स अभिनेत्रीच्या पोस्टवर हार्ट इमोजी बनवून त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत.

या चित्रपटात आलियाशिवाय विजय वर्मा, शेफाली शाह, रोशन मॅथ्यू हे देखील दिसणार आहेत. आलिया या चित्रपटातून निर्माता म्हणून देखील बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. आलियाने गौरी खान (Gauri Khan) आणि गौरव वर्मा यांच्यासोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याशिवाय आलिया लवकरच तिचा पती रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा