सध्या सणांना सुरुवात होत आहे. आताच गणपती येऊन गेले, तर काही दिवसांतच नवरात्र मग दिवाळी असे अनेक सण रांगेतच आहेत. याच दरम्यान लग्नाचा हंगाम देखील सुरू होईल. लग्नाच्या हंगामात अनेक नवनवीन डिजाइनर साड्या आणि लेहेंगा यांना खूप मागणी असते. अनेक मोठमोठ्या ब्रँडने नवनवीन कलेक्शन बाजारात आणले आहे. प्रत्येक हंगामात अनेक ब्रॅंड्स नववधूंसाठी काही तरी खास कलेक्शन नक्कीच आणतात.
दरम्यान ‘मोहे’ हा ब्रँड सध्या जोरदार चर्चेत आला आहे. या ब्रँडने या अगोदर देखील अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत जाहिराती देखील केल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा, क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेता कार्तिक आर्यन अशा अनेक सेलिब्रेटींचा समावेश आहे. त्याचबरोबर या ब्रँडने जाहिरातीसाठी आता नवीन चेहरा शोधला आहे. तो म्हणजे बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्ट.
https://www.instagram.com/p/CT7LxmuPgPp/?utm_source=ig_web_copy_link
आलिया या नववधूच्या वेशात खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर ती या जाहिरातीमध्ये ‘कन्यादान’ विषयी बोलत आहे. यामध्ये ती म्हणत आहे की, मुलगी ही दान करायची गोष्ट नसून दिला मान दिला पाहिजे. मात्र आता आलियाला ही जाहिरात खूप महागात पडली आहे. कारण काही लोकांचे असे मत आहे की, तिने हिंदू धर्माचा अपमान केला आहे. याच कारणावरून सध्या ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. अनेक लोकांना तिचे हे मत अजिबात पटले नाही.
सध्या आलिया भट्टच्या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती मंडपात वधूच्या रूपात दिसत आहे. त्याचबरोबर ती सांगत आहे की, कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिच्यावर किती प्रेम करतो. याच दरम्यान तिने विवाह या संस्कारातील एका महत्वाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ती म्हणत आहे की, “मुलीला ‘पराया धन’ म्हटले जाते. मुली दान करण्याची गोष्ट आहे का? फक्त कन्यादानच का? नवीन कल्पना ‘कन्यामान.’”
https://www.instagram.com/tv/CT7NZY8gMjh/?utm_source=ig_web_copy_link
Multiple thoughts on what @aliaa08 thought getting into this:
1) I will become 4th wife but atleast I will have my dignity!
2) Kanyadan bad, father giving away bride in Church is sooo romantic and kool.
3) In her religion she doesn't get equal inheritance.#KanyaDaan #Mohey pic.twitter.com/dvXaGvvUq7
— Wokeflix (@wokeflix_) September 18, 2021
आलिया भट्टचा हा व्हिडिओ काही लोकांना आवडत आहे. मात्र काही लोक तिच्या कल्पनेवर नाराजी व्यक्त करत आहेत. तर काही लोकांनी आलियावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. काही युजर्सचे असे मत आहे की, “आलिया भट्टने हिंदू धर्माचा अपमान केला आहे.” तर काहींनी असेही म्हटले आहे की, “सर्व ब्रँड वारंवार हिंदू प्रथा आणि परंपरा यांना लक्ष्य करतात. असे म्हणत पुढे आलिया भट्ट आणि ब्रँडवर बहिष्कार घालण्याची मागणी घातली आहे.
#BoycottAlia #mohey
They keep attacking our cultures and we still praise them.. #Hindutva #HinduWithBJP #Hinduism #hindi— Devmurarjee Mayank (@Devmurarjee) September 18, 2021
Dear @aliaa08, saw your woke Ad which is insulting hindu rituals, specially "Kanyadaan"!
Before you question others, just look inwards to the very industry you work. "Beti paraya dhan" is a line made popular by "BOLLYWOOD".
— Ron Bikash Gaurav (@RonBikashGaurav) September 19, 2021
@aliaa08
They love Halala , Mutah etc…
And they hate Kanyadaan.
His father was converted to enjoy marriage .See their character.Guttet bollywood. https://t.co/4lNDMYfovS pic.twitter.com/mtVfJAsxZY— परन्तप।।।।।। (@Shailen21700429) September 18, 2021
Woke feminism by drugwood to reform Hinduism. But total silence on cult of Halala, TTT, Polygamy, Iddat, Child marriage that views women as property@aliaa08 is probably inspired by her women-empowerment champ daddy to give gyan on Kanya ka Maanpic.twitter.com/HwDUuvHlmN
— Gems of Bollywood (@GemsOfBollywood) September 18, 2021
सोशल मीडिया युजर्सचे असे मत आहे की, “हलाला आणि तिहेरी तलाकसारख्या गैरप्रकारांविरुद्ध पुरेशी जागरूकता पसरवली जात नाही. परंतु हिंदू परंपरेच्या विरोधात बरेच काही बोलले जाते.” तर काही, युजर्सनी असेही म्हटले आहे की, “हेच बॉलिवूड मुलींना परकीय संपत्ती म्हणून वर्णन करणारे चित्रपट बनवतात आणि नंतर त्याला हिंदू धर्माशी जोडत समाजसुधारकाची भूमिका घेतात.” अशा प्रकारे अनेक युजर्सनी आलियावर जोरदार टीका केल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ओह लडकी ऑंख मारे! उर्वशी रौतेलाच्या नजरेच्या बाणाने चाहते झाले पुरते घायाळ
-सतत बदलणाऱ्या मूडमध्ये ‘हा’ आहे बेबोचा ‘फॉरएव्हर मूड’; पोस्ट शेअर करून दिली माहिती










