Monday, July 8, 2024

‘शमशेरा’ चित्रपटातील रणबीरच्या लूकवर आलिया भट्ट फिदा, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

 

बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर सोशल मीडियावर बरेच चर्चेत असतात. रणबीरने आपल्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. बॉलिवूडच्या सर्वात चर्चित कुटुंबातील म्हणजेच कपूर कुटुंबातील तो चौथ्या पिढीचा सदस्य आहे. त्याच्या अभिनयामुळे आणि गुड लुक्समुळे तो बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जातो. या ‘चॉकलेट बॉय’ रणबीरचे आजवर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले आहे. परंतु, सध्या आलिया आणि रणबीरचे अफेअर जास्तच चर्चेचा विषय बनले आहे.

नुकतेच यशराजने रणवीरच्या आगामी चित्रपट ‘शमशेरा’तील त्याच्या लूकचे पोस्टर प्रदर्शित केले. हे पोस्टर आणि त्यात असणारा रणबीरचा लूक सध्या खूपच चर्चेत आहे. या पोस्टरमध्ये त्याचा लूक खूपच हटके आणि उत्साह वाढवणारा आहे. रणबीरच्या या लूकवरून त्याचे फॅन्स आणि कलाकार देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र या सर्वांमध्ये रणबीरच्या गर्लफ्रेंडने म्हणजेच आलिया भट्टने या पोस्टरवर आणि रणबीरच्या लूकवर दिलेली प्रतिक्रिया सध्या चांगलीच लाइमलाईट्मधे आली आहे. आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून रणवीर लूक दाखवणारे पोस्टर शेअर केले असून, सोबतच काही ईमोजी देखील पोस्ट केल्या आहेत. नुकताच रणबीरने त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आलियाने, ‘हॅप्पी बर्थडे माय लाईफ’ असे लिहिले होते. तिची ही पोस्ट देखील खूपच चर्चेत आली आहे.

Photo Courtesy: Instagram/aliabhatt

रणवीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त हे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. हा चित्रपट १८ मार्च २०२२ ला प्रदर्शित होणार असून, ‘शमशेरा’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे. या लूकमध्ये रणबीरची तेज नजर, मोठे केस, निर्वाण चेहरा पाहून फॅन्सच्या मनात चित्रपटाबद्दल आणि रणबीरच्या लुकबद्दल अनेक प्रश्न निर्माण करत आहे. त्याचा हा लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये रणबीरसोबतच, ‘A Legend Will Rise.’ ही टॅगलाईन देखील लक्ष वेधून घेत आहे.

रणबीर कपूरच्या कामाविषयी बोलायचं झालं , तर तो लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात आलिया भट्टसोबत दिसणार आहे. रणबीर आणि आलिया व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय रणबीर कपूर ‘एनिमल’ मधून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे . त्यांचे चाहते या दोन्ही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘असं रूप आणि शृंगार असल्यास कोणासही येड लागेल’, म्हणत चाहत्यांनी केले अक्षयाच्या सौंदर्याचे कौतुक

बॉलिवूडमधील ‘या’ चित्रपटांमध्ये जेठालाल यांनी साकारल्या होत्या लहान-मोठ्या भूमिका, आज आहे टेलिव्हिजनवरील सुपरस्टार

‘या’ सुपरहिट चित्रपटांसाठी ‘या अभिनेत्री होत्या पहिली पसंती, कोणी प्रेग्नन्सीमुळे तर कोणी ब्रेकअपमुळे सोडले सिनेमे

हे देखील वाचा