Thursday, June 26, 2025
Home बॉलीवूड लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलिया भट्टने रणबीरसाठी शेअर केली खास ‘हॅप्पी डे’ पोस्ट

लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलिया भट्टने रणबीरसाठी शेअर केली खास ‘हॅप्पी डे’ पोस्ट

बॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून सर्वात आधी नाव येते ते आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या जोडीचे. आज या जोडीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. मागच्या यावर्षी आजच्याच दिवशी त्यांनी खासगी समारंभात लगीनगाठ बांधली होती. आज आलिया आणि रणबीर या दोघांना त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी फॅन्ससोबतच, बॉलिवूड कलाकार आणि कुटुंबीय शुभेच्छा देत आहेत. अशातच आलिया भट्टने देखील तिच्या नवऱ्यासाठी रणबीरची एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आलिया भट्टने रणबीरला सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच तिने त्यांचे काही अनसीन फोटो देखील शेअर केले आहेत. आलियाने शेअर केलेल्या पहिला फोटो त्यांच्या हळदी समारंभाचा आहे. दोघांच्याही चेहऱ्याला हळद लागलेली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघे एकत्र वेळ घालवताना दिसत आहे. यातच कदाचित रणबीरने आलियाला प्रपोज केले असेल तेव्हाच हा फोटो असावा. तिसऱ्या फोटोत दोघेही रोमॅंटिक दिसत आहे. हे फोटो शेअर करत आलियाने लिहिले, “हॅप्पी डे”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Soni Razdan (@sonirazdan)

अभिनेत्री नितु कपूर यांनी देखील या जोडीला हटके अंदाजात त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या दोघांच्या लग्नातला एक फोटो शेअर करत लिहिले, “लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या आनंदी मुलांनो. माझ्या हृदयाच्या जवळचे खूप प्रेम आणि आशीर्वाद.”

तर आलिया भट्टच्या आईने अर्थात अभिनेत्री सोनी राजदान यांनी देखील त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “मागच्यावर्षी याच दिवशी माझ्या स्वीट हार्ट्सने चांगल्या वाईट आणि प्रत्येक वेळेसाठी एकमेकांसोबत राहण्याचे वाचन दिले. दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नाबद्दल फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आलियाने त्यांच्या मुलीला राहाला जन्म दिला.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

मिनी स्कर्ट आणि हॉट पॅन्ट यांचा अविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध फॅशन डिझायनरचे दुःखद निधन

जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत शाहरुख खानला स्थान, ऑस्कर विजेत्या राजामौलीचा देखील समावेश

हे देखील वाचा