Tuesday, July 9, 2024

‘ही तर जलपरी’, आलिया भट्टचा अंडरवॉटर बिकिनी फोटो पाहून चाहत्यांची झक्कास प्रतिक्रिया

अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या स्टाईलने नेहमीच चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करत असते. आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून ती तिच्या फॅन्सला तिच्याशी जोडून ठेवण्याची एकही संधी सोडत नाही. नुकताच काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. जो फोटा पाहून सगळे तिला जलपरी म्हणत आहेत. तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे.

आलियाने हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहिले आहे की, “आतापर्यंतचा सगळ्यात सुंदर दिवस.” या फोटोत ती पाण्याच्या आत पोहताना दिसत आहे. यामध्ये तिने असे पोज दिले आहेत की, तिला सगळे आलिया नाही, तर जलपरी म्हणत आहेत.

या फोटोत तिने पिवळ्या आणि राखाडी रंगाची बिकिनी घातली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोवर अनेकांच्या गमतीशीर कमेंट येत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘ही तर जलपरी आहे.’ दुसऱ्याने ‘मी स्वप्न तर बघत नाहीये ना…’ असे लिहिले आहे.

तिने 15 मार्चला आपला 28 वा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या या वाढदिवशी आठवणीत ठेवण्यासाठी रिद्धिमा सहानी हिने काही थ्रोबॅक फोटो शेअर केले होते. यावर्षी आलिया तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत वाढदिवस साजरा नाही करू शकली. रणबीरला कोरोनाची लागण झाल्याने तो कॉरंटाईन आहे.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आलिया, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा ‘ब्रह्मास्त्र‌’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात देखील ती दिसणार आहे. तिचा ‘आरआरआर’ या चित्रपटातील लूक देखील‌ प्रेक्षकांसमोर आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री पूजा बेदीच्या ‘या’ कंडोम जाहिरातीने उभा ठाकला होता वाद, दूरदर्शनवर केली होती बंद, पाहा बोल्ड फोटो

-निया शर्माचे बाथटबमधील फोटो करतायत सोशलवर धमाल, प्रेक्षकांचा मिळतोय भरभरून प्रतिसाद

-मिलिंद सोमण यांनी पत्नी अंकिताला किस करतानाचा फोटो केला शेअर; ‘बेस्ट कपल’ म्हणत चाहत्यांनी केले कौतुक!

हे देखील वाचा