Tuesday, July 9, 2024

खरंच की काय! बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाला डेट करतेय ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री? रंगलेल्या चर्चांवर दिली तिने प्रतिक्रिया

सिनेसृष्टीमधे नेहमीच अफेअर, ब्रेकअप अशा बातम्या सुरूच असतात. या क्षेत्रात रोज नाती तयार होतात आणि रोज तुटतात. एखाद्या कलाकाराला दुसऱ्या कलाकारांसोबत २/३ वेळा पाहिले, की त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगायला लागतात. अपवाद वगळता कधी कधी या बातम्या खऱ्या देखील असतात. मात्र जेव्हा मीडियामध्ये एकच बातमी रंगवून रंगवून लिहिली जाते, तेव्हा कलाकरांना कधीतरी समोर येऊन अशा बातम्यांवर खुलासा करावाच लागतो. मुलाखती, सोशल मीडिया यामार्फत कलाकार असे खुलासे करतात.

आता बॉलिवूडमध्ये नवीनच पदार्पण केलेल्या आलिया फर्नीचरवालाचेच घ्या. एक सिनेमा केलेली आलिया सिनेमापेक्षा तिच्या अफेअरमुळेच जास्त चर्चेत आली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या घरातल्या मुलासोबत आलियाच्या अफेअर आहे, अशा बातम्या मागील बऱ्याच काळापासून येत आहे. या मुलाचे नाव आहे ऐश्वर्य ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू असलेला ऐश्वर्य ठाकरे हा स्मिता आणि जयदेव ठाकरे यांचा मुलगा आहे. या दोघांच्या नात्याबद्दल आलिया नुकतीच अनेक मुलाखतीदरम्यान मनमोकळेपणाने बोलली.

यावेळी आलिया म्हणाली, “ऐश्वर्य आणि माझ्याबद्दल ज्या चर्चा सुरू आहेत, ते सर्व मला माहित आहे. पण तो माझा फक्त एक चांगला मित्र आहे. तो खूप हुशार आणि प्रतिभावान मुलगा आहे. माझ्या पर्सनल लाईफबद्दल मी फार टेन्शन घेत नाही. मी फक्त माझ्या प्रोफेशनल लाईफचा विचार करते. माझ्या खासगी आयुष्यात जे व्हायचे ते होईल. सध्या तरी मला माझ्या कामावर फोकस करण्याची गरज आहे.”

या आधी ऐश्वर्य फॅमिली फ्रेन्ड असल्याचे आलिया म्हणाली होती. ऐश्वर्य ठाकरेचा वाढदिवस दुबईत दणक्यात साजरा झाला होता. या पार्टीत बॉलिवूड अभिनेत्री आलिया फर्निचरवाला हिने खूप लक्ष वेधून घेतले. ऐश्वर्यचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलिया दुबईला पोहोचली होती. या पार्टीचा एक व्हिडीओ स्मिता ठाकरे यांनी शेअर केला होता. विशेष म्हणजे स्मिता यांनी हा व्हिडीओ शेअर करताना आलियाला टॅग केले होते. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. शिवाय या फोटोची जोरदार चर्चाची रंगली होती. आलिया अभिनेत्री पूजा बेदीची लेक आहे. पूजाने १९९० साली फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले होते. पूजाला दोन मुले आहेत आलिया आणि ओमर. तसेच पूजाने २००३ साली पती फर्निचरवालापासून घटस्फोट घेतला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कलाकारांनी व्यक्त केला शोक

-‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

-‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

हे देखील वाचा