अलका याज्ञिक या बॉलिवूडमधील सुपरहिट गायकांपैकी एक आहे. लता मंगेशकर यांच्यानंतर सर्वाधिक झळकलेल्या अलका याज्ञिक यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. बर्याच दिवसांपासून मुंबईत वास्तव्यास असलेल्या अलका याज्ञिक आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहे.
अलका (alka yagnik) यांनी आपले आयुष्य गायनाला समर्पित केले. अलका याज्ञिक यांना संगीतासाठी पतीसोबत राहण्याची संधी मिळाली नाही. संगीताने अलकाला मुंबईत खेचले आणि जवळपास 27 वर्षांपासून अलका त्यांच्या पतीपासून दूर मुंबईत राहतात. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी गायनाला सुरुवात करणाऱ्या अलका याज्ञिक यांनी 90 च्या दशकात आपल्या सुरेल आवाजाने सर्वांची मने जिंकले.
अलका याज्ञिक 1986 मध्ये पती नीरज कपूरला भेटल्या
तर झाले असे की, अलका आपल्या आईसोबत कोलकाता येथून दिल्लीला आल्या होत्या. अलका यांच्या आईच्या मैत्रिणीचा भाचा त्यांना स्टेशनवर घ्यायला आला होता. दोघेही इथे पहिल्यांदाच भेटले होते. नीरज कपूरने मुंबईत अलकाशी मैत्री केली आणि दोघेही बोलू लागले. काही महिने बोलल्यानंतर दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. जवळपास दोन वर्षांच्या नात्यानंतर अलकाचे पहिले बॉलिवूड गाणे हिट झाले. ते गाणे ‘एक दो तीन’ हे होते. या गाण्याच्या यशाने अलकाच्या आयुष्यात रंग भरले. त्याच वर्षी दोघांनीही त्यांच्या नात्याचे लग्नात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांनीही आपल्या पालकांना याची माहिती दिली.
अलका याज्ञिक 1989 मध्ये अडकली लग्न बंधनात
दोघांचे आई-वडील लग्नाला राजी होते, पण दाेघांना आधीच इशारा दिला हाेता की दाेघांचे नाते लाॅन्ग डिस्टेंस राहिल. त्यामुळे दोघांचे नाते तुटण्याची शक्यता देखील आहे. यानंतरही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 1989 मध्ये लग्न बंधनात अडकले. मात्र, लग्न झाल्यापासून दोघेही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत. लग्नाच्या सुरुवातीला नीरज यांनी मुंबईत व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्नही केला होता, पण नीरज यांचा मुंबईत व्यवसाय चालत नसल्याने त्यांनी शिलाँगला परतण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघेही जवळपास 27 वर्षे एकमेकांपासून दूर राहत आहे, पण दोघांमध्ये खूप प्रेम आहे.
नीरज शिलाँगमध्ये आपला व्यवसाय सांभाळतात, तर अलका गाण्यांमुळे मुंबईत राहते. दोघांच्या वैवाहिक जीवनातही तणावाचे वळण देखील आले हाेते. या कारणावरून दोघांमध्ये 3-4 वर्षांपासून मतभेत निर्माण झाले होती. बऱ्याच भांडणानंतर दोघांनीही लग्न मोडण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, लवकरच दोघांना एकमेकांच्या प्रेमावर विश्वास बसला आणि त्यांनी लग्न अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला. आता दोघेही खूप आनंदी आहेत.( alka yagnik met unexpectedly with husband neeraj kapoor in train firstly 1986 lvn separately for last 27 year know real reason)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आरसी 15’च्या सेटवर प्रभुदेवाने राम चरणला दिले एक खास सरप्राईज, पाहा व्हिडिओ
कार्तिक आर्यन करणार लग्न? अभिनेत्याच्या घोषणेने उडाली खळबळ, जाणून घ्या कोण होणार नववधू