रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे दोघे हे दोघेजण साउथ मधील सुपरस्टार आहेत. तर काही दिवसांपूर्वी हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. या दोघांनी 26 फेब्रुवारी 2026 मध्ये उदयपूर येथे लग्न केले. हे लग्न मोजके पाहुणे आणि मित्र परिवार यांच्या समवेत पार पडले. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतील अनेक सहकलाकारांनासाठी रिसेप्शन पार्टी देण्यात आली. तर आता रश्मिकाच्या माहेरच्या मंडळींना पार्टी देण्यासाठी कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यातील कोडगू या तिच्या मूळ गावी एका भव्य विवाह रिसेप्शनचे आयोजन केले होते
5 एप्रिल रोजी रश्मिका मंदानाने आपला 30 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर, आता रिसेप्शनचे आयोजन केले आहे. तर आता या रिसेप्शन मधील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये, रश्मिका आणि विजय हातात हात घालून सोहळ्यात प्रवेश करताना दिसत आहेत. रश्मिकाने पारंपरिक रेशमी साडी परिधान केली होती, तर विजय (vijay)देवराकोंडाने एक आकर्षक सूट घातला होता. त्यांनी एकत्र केक कापला आणि आपल्या कुटुंबियांसोबत व मित्रांसोबत आनंद साजरा केला आहे. तर आता चाहत्यांनी या जोडप्याच्या केमिस्ट्रीचे आणि रश्मिकाच्या पारंपरिक लूकचे कौतुक केले.
रिसेप्शन दरम्यान रश्मिका भावुक झालेली दिसली. ती म्हणाली, “मी या मातीची कन्या आहे. कोडवा लोकांचे प्रेम माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. तर या दोन कलाकारांनी पहिल्यांदा 2018 च्या सुपरहिट चित्रपट ‘गीता गोविंदम’मध्ये एकत्र काम केले, त्या नंतर हळुहळु या मैत्री आणि प्रेम यात रुपातर झाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
उत्तर रामायणतील बालकलाकारांचा प्रवास, एक सात समुद्रापार, तर दुसरा आहे सुपरस्टार










