दाक्षिणात्य स्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) लोकप्रियता ‘पुष्पा: द राइज’नंतर खूप वाढली आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि कमाईच्या बाबतीतही त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. आता चाहते ‘पुष्पा : द रुल’ची वाट पाहत आहेत. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात होणार आहे. दरम्यान अलीकडेच अल्लू अर्जुन पुष्पा राजच्या लूकमध्ये स्पॉट झाला होता. यादरम्यान त्याचे वजन वाढत असल्याचे दिसले, ज्यामुळे त्याला ट्रोलचा सामना करावा लागला.
एका रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनने ‘पुष्पा: द रुल’साठी वजन वाढवले आहे. यावेळी अल्लू अर्जुन प्रिंटेड ब्लू टी-शर्ट आणि ब्लॅक ट्राउजरमध्ये दिसला. मोठे केस आणि दाढीमध्ये अल्लू अर्जुनला पाहून एकीकडे चाहते आनंदी होत होते आणि त्याचे कौतुक करत होते. त्याचवेळी वाढलेल्या वजनावरून ट्रोल्सनी त्याच्यावर निशाणाही साधला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. (allu arjun gets trolled for his latest appearance in pushpa raj look)
हे फोटो पाहून एका यूजरने लिहिले की, “हा सडक छाप चोरासारखे दिसत आहे, दक्षिणेतील लोक या भिकाऱ्यांचे वेडे आहेत.” तर दुसऱ्याने लिहिले की, “हा दिवसेंदिवस म्हातारा होत आहे.” एवढेच नाही तर एकाने त्याला वडा पाव म्हणत ‘वडा पाव लूक’ असे लिहिले. याशिवाय त्याचा लूक पाहून चाहते खूप खूश आहेत आणि त्याला स्टार म्हणत आहेत. चाहते हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.
‘पुष्पा: द राइज’ हा अल्लू अर्जुनचा असा पहिला चित्रपट होता, जो एकाच वेळी पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तेलुगूमध्ये शूट करण्यात आला असून हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला. त्याचवेळी, नुकतेच चित्रपटाच्या निर्मात्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की चित्रपटाचे शूटिंग ऑगस्टच्या अखेरीस सुरू होऊ शकते. सध्या शूटिंगची तयारी सुरू आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा