Thursday, July 18, 2024

बाबो!!! अल्लू अर्जुनकडून ‘पुष्पा 2’चा डायलॉग लीक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा पहिला चित्रपट पुष्पा खूप गाजला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप पसंती दर्शवली. सध्या तो ‘पुष्पा: द रुल’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. 2021 मध्ये आलेला त्याचा ब्लॉकबस्टर पुष्पा: द राइज – भाग 1 हा सिक्वेल आहे. नुकतीच अल्लू अर्जुनकडून एक मोठी चुक झाली आहे. त्याच्याकडुन एका कार्यक्रमात आगामी सिक्वेलच्या ट्रेलरमधून एक प्रमुख संवाद लीक झाला आहे.

अभिनेता अल्लू अर्जुनने हैदराबादमध्ये ‘बेबी’ चित्रपटाच्या यशानंतक आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ‘पुष्पा 2’चे (Pushpa 2) डायलॉग लीक करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. उत्साहाच्या भरात अल्लू अर्जुनने थेट आगामी ‘पुष्पा 2’ चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवला आहे. तो नेम्हणाला की, “इथे फक्त एकच नियम चालेल… तो आहे पुष्पाचा नियम”, अभिनेत्याचा तोंडून हा डायलॉग ऐकताच प्रेक्षकांनी जोरदार आनंद व्यक्त केला.

या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. त्याचवेळी या कार्यक्रमाचा व्हिडिओ ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर, नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत मोठी चर्चा रंगली आहे.

 एप्रिल महिन्यात ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. ‘पुष्पा 2’ पुढील वर्षी 2024 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर चित्रपटातील आयटम डान्ससाठी उर्वशी रौतेला आणि दिशा पटनी यांच्या नावाची चर्चा आहे. ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुकुमार यांनीच सांभाळली आहे. (Allu Arjun himself leaked the dialogue of ‘Pushpa 2’)

अधिक वाचा-   
नाकातून गातो म्हणून टीकेचा धनी ठरणाऱ्या हिमेशला ‘भाईजान’ने दिलेला पहिला ब्रेक, 120सिनेमांना दिलंय संगीत
‘दिलनवाज शेख’ कशी बनली संजय दत्तची पत्नी मान्यता? लग्नाआधी करायची ‘सी ग्रेड’ सिनेमात काम

हे देखील वाचा