Wednesday, June 25, 2025
Home साऊथ सिनेमा ऍटलीच्या बिग बजेट चित्रपटातून अल्लू अर्जुनची माघार, समोर आलं ‘हे’ मोठ्ठं कारण

ऍटलीच्या बिग बजेट चित्रपटातून अल्लू अर्जुनची माघार, समोर आलं ‘हे’ मोठ्ठं कारण

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचे (Allu Arjun) यशाचे तारे आजकाल गगनाला स्पर्श करत आहेत. ‘पुष्पा’ चित्रपट रिलीझ झाल्यापासून अल्लू सतत चर्चेत आहे. दरम्यान, अलीकडेच अशी बातमी आली होती की, अल्लू अर्जुन लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक ऍटलीसोबत एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. पण चाहत्यांसाठी हा आनंद काही क्षणांसाठीच होता. आता बातम्या येत आहेत की, अल्लू अर्जुनने ऍटलीच्या (Atlee) या नवीन प्रोजेक्टमधून माघार घेतली आहे.

खरं तर, दिग्दर्शक ऍटलीने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपयांची फी मागितली होती. ऍटलीच्या या फीबद्दल ऐकून अल्लू अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्यानंतर त्याने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. मात्र, अशा बातम्यांबाबत कोणत्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य आलेले नाही. हा चित्रपट अल्लू अर्जुनचा बिग बजेट चित्रपट मानला जात होता. (allu arjun pulls his hands back from atlees project reason here)

अल्लू अर्जुन हे साऊथचे मोठे नाव आहे. असे वृत्त आहे की, अल्लू अर्जुनला ‘लाइका प्रॉडक्शन’ने या चित्रपटासाठी १०० कोटींची ऑफर दिली होती. मात्र आता अभिनेत्याने या प्रकल्पातून माघार घेतली आहे. दुसरीकडे, ऍटली सध्या शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि नयनताराच्या (Nayantara) आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

या चित्रपटाचे टायटल सध्या ‘लायन’ असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे नयनतारा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. नयनताराचा हा बॉलिवूड पदार्पण चित्रपट आहे. ऍटलीने यापूर्वी ‘मेर्सल’, ‘थेरी’ आणि ‘बिगिल’ सारख्या हिट साऊथ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा