अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट जबरदस्त यशस्वी ठरला होता आणि त्याला खूप पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंगही लवकरच सुरू होणार आहे. नुकतेच यासाठी एका पूजेचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. पहिल्या भागाचे नाव ‘पुष्पा द राइज’ असे होते, तर दुसऱ्या भागाचे नाव पुष्पा द रुल असे असेल.
पुढील वर्षी जानेवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याची माहिती इन्स्टाग्रामवरील एका पेजवरून शेअर करण्यात आली आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटासाठी १२५ कोटी रुपये मानधन घेत आहे. त्याचबरोबर सुकुमार यासाठी 50 कोटी घेत आहे आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना 5 कोटी घेत आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यात जगभरातील पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा – व्हिलचेअरवर बसून कार्यक्रमात पोहोचली शिल्पा शेट्टी, नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
‘…पण कधीही हिम्मत नाही झाली’, हेमांगी कवीने सांगितला ताज हॉटेलमधील तिचा भन्नाट अनुभव
भारत – पाक हायहोल्टेज सामन्याआधी बॉलिवूड दिग्दर्शकाचे धक्कादायक वक्तव्य, क्रिकेटप्रेमींचा संताप