Thursday, July 18, 2024

मुहूर्त ठरला! अल्लू अर्जुनचा अंगावर काटा आणणारा ‘पुष्पा 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अल्लू अर्जुनच्या प्रत्येक चित्रपट खूप पसंत मिळते. साऊथ सिनेसृष्टीतील ते एक प्रसिद्ध नाव आहे. त्याच्या ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाला देशभरातून प्रचंड प्रेम मिळाले. हा त्याचा पहिला इंडिया चित्रपट होता. ज्याची पटकथा, गाणी आणि अल्लू अर्जुनचा सिग्नेचर डायलॉग ‘मैं झुकेगा नही साला’ खूप प्रसिद्ध झाला होता. आता चाहते दुसऱ्या भागाच्या रिलीजच्या तारखेची वाट पाहत होते. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

सोमवारी (11 सप्टेंबर) निर्मात्यांनी एक बातमी शेअर केली ज्याने चाहते खूप आनंदी झाले आहेत. निर्मात्यांनी रिलीजची तारीख जाहीर केली आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ (pushpa-2) 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत आहेत.

अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकांऊटवर पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “बाप आला..’ दुसऱ्याने कमेंट करत लिहिले की, “मी खूप पुष्पा 2 ची वाट पाहता आहे.” तर अनेकांनी “जुकेगा नाही साला” अशी कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

या चित्रपटाचा टीझर एप्रिलमध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये पुष्पा तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचे दाखवण्यात आले होते. 20 सेकंदाच्या व्हिडिओच्या शेवटी अल्लू अर्जुनची झलक दाखवण्यात आली आहे. ‘पुष्पा 2’ची टक्कर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाशी होऊ शकते. अजय देवगन स्टारर सिंघम अगेनची रिलीज डेटही 15 ऑगस्ट 2024 असल्याचे सांगितले जात आहे. ( Allu Arjun thriller Pushpa 2 will release on Ya day)

अधिक वाचा-
आदिनाथ कोठारे डॅशिंग आवतारात; अभिनेत्याचा रॅपर स्वॅग सोशल मीडियावर चर्चेत
शाहरुख खानच्या ‘जवान’ची अखिलेश यादवांना पडली भुरळ; म्हणाले, ‘जो ज़िंदा हो तो फिर…’

हे देखील वाचा