Tuesday, March 5, 2024

पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुनचा वेगळा अंदाज पाहायला व्हा तयार,विदेशी भाषा बोलताना दिसणार अल्लू

अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा’च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांनी यात मुख्य भुमिका साकारल्या होत्या . 2021मध्ये सर्वांना वेडं करणारा चित्रपट ‘पुष्पा’चा सिक्वल लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा केली होती तेव्हापासून चाहते या चित्रपटाची वाट पाहात आहेत. या चित्रपटाचं नाव ‘पुष्पा 2-द रूल’ असं असणार आहे. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जाणार अशा बऱ्याच बातम्या येत होत्या. पण अशातंच एक अशी बातमी आली आहे, ज्यामुळे अल्लू अर्जुनचे चाहते प्रचंड आनंदी होणार आहेत.

अल्लू अर्जुन बोलणार जापानी
‘पुष्पा 2-द रुल’मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)दोघं मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षकांना अपेक्षा आहे की, पुष्पा प्रमाणेच हा चित्रपटदेखील धमाकेदार आसणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार अल्लू अर्जुन या चित्रपटात जबरदस्त ऍक्शन करताना दिसणार आहे.सिनेमातील एका सिनमध्ये तो जपानी गुंडांसोबत लढताना दिसणार आहे. इतकंच नव्हे तर अल्लू त्या स्मगलरशी फाइट करताना जपानी भाषेत बोलणार आहे. अल्लू पहिल्यांदाच त्याच्या चित्रपटात विदेशी भाषा बोलणार आहे.

‘पुष्पा 2-द रूल’ विवादांच्या भोवऱ्यात
मिडिया रिपोर्टसनुसार अल्लू अर्जुनचा बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा 2-द रूल’ च्या शुटींगला बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन चा को-स्टार अभिनेता जगदीशला मध्यंतरी अटक केले होते. चित्रपटात जगदीश अल्लूच्या(Allu Arjun) मित्राचं पात्र निभावताना दिसणार आहे. अभिनेता जगदीशवर त्याच्या ज्युनियर आर्टीस्टला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

‘पुष्पा 2-द रूल’ची रिलीज डेट
आधी बोललं जात होतं की ‘पुष्पा 2-द रूल'(Pushpa 2- The Rule) 15 ऑगस्ट 2024ला रिलीज होणार आहे. परंतु आता आलेल्या मिडिया रिपोर्टसनुसार या चित्रपटाच्या रिलीज डेटली पुढे ढकलण्यात आले आहे. आता सर्वांचं लक्ष हे ‘पुष्पा 2-द रुल’च्या रिलीज डेटकडे आहे. आता हेच पाहायचं आहे की चाहत्यांना चित्रपटाची आजुन कीती वाट पाहावी लागणार आहे.

हे देखील वाचा