हिंदी चित्रपटसृष्टीतील आदर्श आणि सुसंस्कृत बाबूजी म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या आलोक नाथ (Alok nath) यांनी आपल्या मेहनतीने चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. आलोकने ‘गांधी’ चित्रपटातून फिल्मी दुनियेत एंट्री घेतली होती. मात्र, MeToo मोहिमेदरम्यान आलोक नाथ यांच्यावर मोठे आरोप करण्यात आले.
नीना गुप्तासोबत अफेअर
आलोक नाथ अभिनेत्री नीना गुप्ताच्या (Neena Gupta) प्रेमात पडले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोष्ट त्या दिवसांची आहे, जेव्हा दोन्ही कलाकार टीव्ही सीरियल ‘बुनियाद’मध्ये एकत्र काम करत होते. या मालिकेत आलोक नाथ त्यांच्या सासऱ्याच्या भूमिकेत होते. यानंतर दोघांमधील जवळीक वाढली. रिपोर्ट्सनुसार, दोघे अनेकदा एकत्र दिसले होते. दोघांची एंगेजमेंट झाल्याची बातमीही उडाली होती, पण काही दिवसांनीच त्यांचे नाते संपुष्टात आले. (alok nath controversies during metoo campaign)
मीटूमध्ये नाव आले
आदर्श पिता म्हणून ओळखले जाणारे अभिनेते आलोक नाथ यांच्यावर MeToo मोहिमेदरम्यान एका निर्मातीने आरोप केले होते. आलोक नाथने नशेच्या अवस्थेत आपल्यावर बलात्कार केल्याचे, तिने सोशल मीडियावर लिहिले. यानंतर दोन अभिनेत्रींनीही त्यांच्यावर विनयभंग आणि जबरदस्तीचे आरोप केले होते. या प्रकरणावरून आलोक नाथ वादात सापडले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोशल मीडिया यूजर्सने त्यांची खूप खिल्ली उडवली.
आलोक नाथ यांनी त्यावेळी हे आरोप फेटाळून लावले होते. ते म्हणाले होते, “तिला (आरोप करणाऱ्या महिलेला) विचारा, तुम्ही मला का विचारत आहात? महिलेने जे सांगितले, तेच ब्राह्मण वाक्य आहे ना? तेच सत्य आहे? अशा परिस्थितीत माझी बाजू जाणून घेऊन तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला काय लिहायचे आहे, ते लिहा. असो, माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? या प्रकरणात मी काहीही बोललो तरी लोक ऐकणार नाहीत. मी काहीही बोललो तरी काही फरक पडत नाही. काही उपयोग होणार नाही. प्रत्येकजण फक्त तिच्यावर विश्वास ठेवेल. तिने जे काही सांगितले आहे, ते तिची (क्षुद्र) मानसिकता दर्शवते. माझ्यावर आरोप केले गेले आहेत, परंतु कालांतराने सर्वकाही स्पष्ट होईल.”
आलोक नाथ यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांचा ‘हम आपके है कौन’ हा १०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला. यासोबतच त्यांनी ‘विवाह’, ‘दीवाना’, ‘मैने प्यार किया’ आणि ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा