चार्ली चॅपलीन हे असे व्यक्तिमत्त्व आहे की, ज्यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाहीये. कारण त्यांच्या मृत्यूनंतर आजही लाखो प्रेक्षकांच्या हृदयात आणि मेंदूत ते जीवंत आहेत.त्यांची कारकीर्द प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच ठसा उमटवून गेली आहे. त्यांना कधी विसरण्याचा प्रयत्न केला तरी ते विसरू शकत नाही. चार्ली चॅपलीन यांनी मनोरंजन जगतात आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक मोठे पुरस्कार मिळवले आहेत. देश-परदेशात आपल्या विनोदाने सगळ्यांच्या मनावर ठसा उमटवणारा चार्ली चॅपलीन यांनी भारतामध्ये खूप लोकप्रियता मिळवली. त्यांची १३२ वी जयंती आहे, या निमित्त जाणून घेवूयात त्यांच्या आयुष्यातील कधीही न उलगडलेल्या काही गोष्टी
चार्ली चॅपलीन यांचा जन्म १६ एप्रिल १९८९ मध्ये झाला आणि मृत्यू २५ डिसेंबर १९७७ साली झाला. त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या एक वर्ष आधीपर्यंत काम केले आहे. म्हणजेच वयाच्या जवळपास ७५ वर्षापर्यंत त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली होती. त्यांनी केलेले अनेक चित्रपट आजही अनेक प्रेक्षक विसरू शकलेले नाही. चार्ली चॅपलीन यांचं खरं नाव सर चार्ल्स स्पेंसर चॅप्लिन केबीई हे होते. नंतर ते चार्ली चॅपलीन या नावाने सर्वत्र प्रसिद्ध झाले.
चार्ली चॅपलीन हे एक उत्कृष्ट विनोदी कलाकार, निर्माता आणि संगीतकार होते. त्यांनी सर्वाधिक मुक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या ‘ट्रंप’ या चित्रपटानंतर ते वर्ल्ड आयकाॅन बनले होते. चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये त्यांनी त्यांचे खूप चांगले नाव कमावले आहे. चार्ली चॅपलीन यांच्या खूप कमी चाहत्यांना ही गोष्ट माहिती असेल की, त्यांनी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापासूनच काम करण्यास सुरुवात केली होती. ते पाच वर्षांचे होते तेव्हाच त्यांच्या आईचा आवाज गेला.
या काळात मुक चित्रपट खूप चालत होते. त्यावेळी चार्ली चॅपलीन यांनी टॉकीजला विरोध केला होता. पण नंतर त्यांनी स्वतःचा आवाज देऊन चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. नंतर ऑडिओ चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात चालायला लागले होते. या नवीन प्रयोगाला सुरुवात करताना चार्ली चॅपलीन खूप घाबरले होते, कारण त्यांना भीती वाटत होती की, हे जर प्रेक्षकांना आवडलं नाही तर आपली सगळी मेहनत वाया जाईल.
चार्ली चॅपलीन हे अमेरिकेमध्ये राहत होते. ते जवळपास 40 वर्षं अमेरिकेमध्ये राहिले. परंतु इतक्या वर्षे राहूनही त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त झालं नाही. त्यानंतर त्यांना सरकारकडून तो देश सोडण्याचा आदेश आला. पुढे त्यांना अमेरिका हा देश सोडावा लागला. चार्ली चॅपलीन एक प्रतिभावंत अभिनेता होते. त्यांच्या मृत्यूनंतरही आज ते प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या कारकिर्दीने, त्यांच्या अभिनयाने आणि विनोदाने आज कितीतरी चाहत्यांचे आयुष्य समृद्ध केले.