अली गोनी (Aly Goni) हा हिंदी मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने अलीने या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होताना दिसत असते. आज ( 25 फेब्रुवारी) अली गोनी आपला वाढदिवस लंडनमध्ये त्याची गर्लफ्रेंड जॅस्मिन भसीनसोबत (Jasmine Bhasin) साजरा करत आहे. मात्र अली गोनीचे नाव याआधी अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे कोण आहेत या अभिनेत्री चला जाणून घेऊ.
हिंदी मालिका क्षेत्रातील हँडसम अभिनेता म्हणून अली गोनीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अली आपल्या अभिनयासाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच तो त्याच्या देखण्या लूकमुळे चर्चेत असतो. त्यामुळेच त्याच्यावर अनेक अभिनेत्री फिदा आहेत. सध्या अली त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनला रवाना झाला आहे. त्याच्याबरोबर त्याची गर्लफ्रेंड जॅस्मिन भसीनसुद्धा आहे. अली आणि जॅस्मिन ‘बिग बॉस १४’ पासून एकमेकांना डेट करत आहेत. या कार्यक्रमातच दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हापासुन दोघेही सोबत आहेत. मात्र अली याआधीही अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिप मध्ये राहिला आहे. त्यामुळेच त्याचे आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. कोण आहेत या अभिनेत्री ज्यांना अलीने डेट केले आहे चला जाणून घेऊ.
सुबुही जोशी
अली गोनीच्या अभिनयाची सुरूवात ‘स्प्लिट्सविला’मधून झाली होती. यामधील स्पर्धक सुबुही जोशी आणि अलीच्या प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा त्याकाळात रंगली होती. अली अनेक वर्ष तिला डेट करत होता. याचा खुलासा सुबुहीने ‘बिग बॉस १४’च्या दरम्यान केला होता.
कृष्णा मुखर्जी
अली गोनीला एकता कपूरच्या ‘ये है मोहब्बतें’ मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ही मालिका त्याच्या यशात मैलाचा दगड ठरली होती. याच कार्यक्रमात अली आणि कृष्णा मुखर्जी यांची मैत्री झाली होती. दोघांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सुद्धा त्या काळात होत होती. दोघांनी अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. अनेकदा दोघेही एकत्र फिरताना दिसले होते. मात्र दोघांनीही त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल कधीही खुलासा केला नाही.
नताशा स्टेनकोविक
अली गोनीच्या चर्चित प्रेम प्रकरणामध्ये मॉडेल नताशाचे नावसुद्धा घेतले जाते. अली आणि नताशा अनेक वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांनी ‘नच बलीये’ कार्यक्रमात जोडीने सहभाग घेतला होता. मात्र काही काळाने त्यांच्यात दुरावा निर्माण झाला ज्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा –