Saturday, June 29, 2024

अली गोनीच्या मानेवरील ‘रेड मार्क’ पाहून पॅप्पराजींनी लावला भलताच अंदाज; अभिनेता म्हणाला, ‘तसं काही नाहीये…’

सध्याच्या टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात हिट आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अली गोनी. स्टार प्लसच्या प्रसिद्ध ‘ये हैं मोहब्बते’ मध्ये अलीने दुसरी महत्वाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्याला तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र बिग बॉसमध्ये त्याने स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली, त्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली. या शोमधून त्याने अनेकांचे मन जिंकून घेतले आहे. सध्या तो त्याच्या अनेक म्युझिक व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. अशातच त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल भयानीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून अली गोनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. नुकतेच पॅप्पराजींने अलीला स्पॉट केले. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अली गाडीकडे जात असतो. त्याच्या डोळ्यांवर चष्मा तसेच मास्क घातलेला असतो. त्याच्या मानेवर रेड मार्क्स असतात. ते पाहून पॅप्पराजी विचारतात की, “हे मानेवर काय झाले आहे?” त्यावर अली उत्तर देतो की, “जो तू विचार करत आहेस तसं काहीच नाहीये.” हे ऐकून सगळे खूप हसायला लागतात.

त्यानंतर पॅप्पराजी त्याला मास्क काढायला सांगतात तो देखील मास्क काढून त्यांना पोझ देतो. यानंतर एक जण त्याला मास्क देतो, यावर त्याच्या नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘दो फोन’ या गाण्याच्या पोस्टरचा फोटो असतो. अलीला देखील हा मास्क खूप आवडला. तो लगेच हा मास्क लावून पुन्हा पोझ देताना दिसत आहे. त्याच्या चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. (Aly goni spotted to paprazzi, they are thinking about red marks on Aly goni’s neck)

अली गोनी हा बिग बॉसनंतर खूप चर्चेत आला होता. त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची भर पडली आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने ‘नागीण’, ‘कुछ तो है तेरे मेरे दरमिया’, ‘साथ निभाना साथिया’, ‘दिल ही तो है’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्याचे ‘दो फोन’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा